मराठा आरक्षण विषय मार्गी न लागल्यामुळे मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही- विक्रांत दादा शिंदे

 

प्रतिनिधी ; महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे व जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील व नांदेड जिल्ह्यातील दत्ता पाटील हडसणीकर व असंख्य जन मराठा आरक्षणासंदर्भात आमरण उपोषणास बसले असून अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अत्यंत खालावली आहे

 

 

,सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांसाठीच्या हिताचे व मराठा समाजातील सर्व स्तरातील नागरिक विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यातील आयुष्याच्या उपयोगासाठी या मराठा आरक्षण आमरण उपोषणास व आंदोलनाच्या समर्थनात मी आज दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोज शनिवार रोजी चा माझा वाढदिवस साजरा करणार नाही, तरी लोहा कंधार मतदारसंघासह सर्व मराठवाड्यातील माझे हितचिंतक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना नम्र विनंती करतो की,आज रोजी च्या माझ्या वाढदिवसानिमित्त मी हारतुरे घेणार नसल्यामुळे सर्व माझे हितचिंतक, कार्यकर्ते, मायबाप जनतेने मला तुमच्या शुभेच्छा रुपी आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी खंबीरपणे राहू द्या असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा सहचिटणीस तथा विक्रांत दादा शिंदे मित्र मंडळाचे अध्यक्ष विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे यांनी सर्व मतदार, हितचिंतक, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना नम्र आवाहन केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *