कंधार : ( प्रतिनिधी )
येथील पत्रकार विश्वांभर बसवंते यांना भाजपाचे माजी महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या हस्ते दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी मंगळवारी एका सन्मान सोहळ्यात “मुकनायक पत्रकारिता पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, मेडल, शाल, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दैनिक वृत्त महानगरचा दुसरा वर्धापन दिन व सन्मान सोहळा मंगळवारी, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गणराज हाॅटेल, नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे माजी महानगराध्यक्ष प्रविण साले हे होते. तसेच उद्घाटक नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक नेते नारायण गायकवाड, डॉ.प्रमोद अंबाळकर, राष्ट्रवादीचे नेते गणेश तादलापुरकर, भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस विजय गंभीरे, भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल हजारी, जेष्ठ पत्रकार डॉ.गंगाधर तोगरे, व्यकंट मोकले, शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले, ॲड.विजय गोणारकर, संपादक कुलदीप सुर्यवंशी गोणारकर, निवासी संपादक विजयकुमार वाघमारे, कार्यकारी संपादक रणजीत गोणारकर, ब्युरो मॅनेजर प्राचार्य संदीप गोणारकर, वरिष्ठ जाहिरात व्यवस्थापक श्रीनिवास हाळदेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या सन्मान सोहळ्यात पत्रकार विश्वांभर बसवंते यांना भाजपाचे माजी महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या हस्ते दैनिक वृत्त महानगरचा सन २०२३ चा मुकनायक पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, मेडल, शाल, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पत्रकार विश्वांभर बसवंते हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक महत्त्वपूर्ण पदे त्यांनी भूषविले आहेत. यापूर्वी त्यांना दोन पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. पत्रकार विश्वांभर बसवंते यांना मुकनायक पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.