कंधार ; प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषद वर्धापन दिन व कृष्णजन्माष्टमी निमित्त छ. शिवाजी महाराज चौक, कंधार येथे दि .६ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवात सहा थर रचून नांदेड येथील जय बजरंग गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. या पथकाला ५१ हजार रूपयांचे पारितोषिक व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे लोहा- कंधार विधानसभा प्रमुख प्रविण पाटील चिखलीकर हे होते. उद्घाटक शिवसेनेचे नेते अॅड. मुक्तेश्वर धोंडगे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य पुरुषोत्तम धोंडगे, माजी नगरसेवक शहाजी नळगे, पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, माजी पं.स. सदस्य उत्तम चव्हाण, सत्यनारायण मानसपुरे, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी चेतन केंद्रे, भाजपा शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, कंधार कृउबा समितीचे नवनिर्वाचित संचालक शाहूराज गोरे, सुधाकर कौसल्ये, मधुकर डांगे, बालाजी तोटावाड, राजकुमार केकाटे, प्रकाश घोरबांड आदींची उपस्थिती होती.
या दहीहंडी उत्सवात पाच गोविंदा पथकांने सहभाग घेतला होता. त्यात नांदेड येथील जय बजरंग गोविंदा पथकाने सहा थर रचून दहीहंडी फोडली. या मंडळाला प्रायोजक मामडे ज्वलर्स तर्फे ५१ हजार रूपयांचे पारितोषिक व स्मृतीचिन्ह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या दहीहंडी उत्सवात सहभाग घेणाऱ्या गोविंदा पथकांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.
दहीहंडी उत्सव यशस्वीतेसाठी प्रवीण बनसोडे, शुभम संगणवार, तारकेश तपासे, अॅड.सागर डोग्रजकर, रवी संगेवार, पंडित ढगे, शुभम पापड़, राजरत्न सूर्यवंशी, सुरेश कल्याणकार, मंगेश स्वामी, अजय मोरे, संतोष कांबळे, विशाल बासटवार आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अँड. गंगाप्रसाद यन्नावार यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दत्तात्रय एमेकर यांनी केले. तर आभार प्रायोजक शिवा मामडे यांनी मानले. या दहीहंडी उत्सवाला असंख्य दहीहंडीप्रेमींनी मोठी गर्दी केली .