प्रतिनिधी,
कैलास शेटवाड.
-ग्रा.पं.पेठवडज समोरील उपोषणाला बसलेल्या जालना येथील सराटी येथे कुणबी मराठा आरक्षणाला श्री.मनोज जरांगे पा.यांना पाठिंबा म्हणून ग्रा.का.पेठवडज उपोषणकर्त्यांना श्री.नामदेव डावकोरे (ग्रामपंचायत सदस्य) व श्री.संभाजी पा.बाबा गोंधळे (ज्येष्ठ नागरिक) यांना पाठिंबा म्हणून या गावातील शेतकऱ्यांनी पोळ्यानिमित्त मनोज जरांगे यांना समर्थन देऊन सकल कुणबी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात यावे म्हणून बैल व बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
तरी शासनाच्या विरोधात मराठा आरक्षण मिळण्याबाबत शेतकरीच नव्हे तर त्यांचा साथीदार व शेतकऱ्यांचा बैलपण मनोभावे शासनाच्या विरोधात मोर्चामध्ये सामील झाले. असता यावेळी सर्व शेतकरी बांधव तसेच बैलगाडी व बळीराजा शेतकरी व तसेच शेतकऱ्याना कुणबी मराठा आरक्षणाबाबत समर्थन म्हणून श्री. मनोज जरांगे पा.यांना व ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज येथील उपोषणकर्त्यांना शेतकरी बळीराजा यांनी पोळ्यानिमित्त पाठिंबा दिला आहे त्यावेळी सर्व शेतकरी व जनसमुदाय व तसेच नागरिक व उपोषणकर्त्यासोबत असलेले सर्व गावकरी मंडळ सकल कुणबी मराठा व तसेच त्यांचे सहकारी सर्व उपस्थित कार्यकर्ते होते .