प्रतिनिधी, कंधार
श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळ, कंधारच्या वतीने सोमवारी, ११ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता संतसेना नगरात अभिवादन करण्यात आले.
यावेळी ह.भ.प.गोविंद महाराज अंबुलगेकर, भाजपाचे लोहा – कंधार विधानसभा प्रमुख प्रविण पाटील चिखलीकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर सावरकर, सचिव प्रभाकर श्री भगत सेनाजी श्रीमंगले, सेवानिवृत्त प्राचार्य किशन डफडे, माजी नगरसेवक सुनील कांबळे, माजी नगरसेविका अनिता कदम, भाजपाचे तालुका सरचिटणीस मधुकर डांगे, श्यामसुंदर शिंदे, निलेश गौर, परमेश्वर कटकमवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी श्री संत सेना महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी नागनाथ श्रीमंगले, राजेश श्रीमंगले, बालाजी शिंदे, माधव श्रीमंगले, विठ्ठल श्रीमंगले, ज्ञानोबा रासवते, रामचंद्र राजगीरे, नागनाथ राहेरकर, श्रीनिवास सावरकर, माधव चमकुरे, दिगंबर रासवते, आनंद सावरकर, प्रकाश श्रीमंगले आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय एमेकर यांनी केले. तर आभार महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे माजी तालुकाध्यक्ष नामदेव श्रीमंगले यांनी मानले. यावेळी नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.