यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

नांदेड: (दादाराव आगलावे)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत, विद्यापीठ अधिकार मंडळांनी घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम बी.एड., बी.एड. विशेष इत्यादी शिक्षण क्रमांव्यतिरीक्त सर्व शिक्षणक्रमांची सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस दिनांक २० सप्टेंबर २०२३ पर्यंत विनाविलंब ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश अर्ज विभागीय केंद्र मान्यता मुद्दत ही २३ सप्टेंबर २०२३ पर्यंत राहील तरी विभागीय कार्यालय नांदेड अंतर्गत सर्व केंद्रांनी वेळापत्रकातील बदलाप्रमाणे प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावे असे आव्हान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय कार्यालय नांदेड यांच्या वतीने वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. बी के मोहन यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *