संतोष पांडागळे विविध क्षेत्रांतील अष्टपैलू व्यक्तिमत्व – माजी मंत्री . डी. पी. सावंत

 

नांदेड (प्रतिनिधी)

शिराढोण सारख्या ग्रामीण भागातून नांदेड येथे येऊन आपला स्वकृतत्वाने आपला जिल्हाभर स्वतःची छाप पाडली आहे.माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणे, विश्वासाच्या चाळण्यातून यशस्वीरित्या उत्तीर्ण होणे, ही किमया साधत संतोष पांडागळे यांनी पत्रकारिता, समाजकारण, राजकारण, शिक्षण, निवेदक अशा विविध क्षेत्रांत यश मिळविले आहे.

त्यामुळे संतोष पांडागळे हे विविध क्षेत्रांतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी काढले
जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते, दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या वाढदिवसाचा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली काल शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. या अभीष्टचिंतन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

अभीष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय संघटक, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. मोहनअणा हंबर्डे, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लहानकर, निजामाबाद माजी महापौर वेणू, पूर्णा येथील ज्येष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड, मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी सुभाष लोणे, आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस राम तरटे यांनी केले.

यावेळी पुढे बोलतांना डी. पी. सावंत म्हणाले की, संतोष पांडागळे यांचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता आणि धार्मिक क्षेत्रातील प्रवास हा खडतर आणि परिश्रमपूर्वक आहे. पांडागळे यांनी ज्या ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले त्या त्या क्षेत्राला भरभराटी आली. महात्मा फुले शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम इंग्रजी शिक्षक मिळाला. युवक कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते म्हणून राजकीय जीवनाला सुरूवात केली. या क्षेत्रात आणि या पदाला त्यांनी एक उंची मिळवून दिली. युवक काँग्रेसमधून ते आता काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी उत्तमरित्या काम पाहतात.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा त्यांनी विश्वास मिळविला आहे. या विश्वासाच्या पात्रतेसाठी आवश्यक असणान्या सर्व चाळण्यांमधून ते यशस्वीपणे ठरले आहेत. त्यामुळे याही क्षेत्रात पांडागळे ज्यांनी स्वकर्तृत्वाने आपल्या नावाचा अमीट असा ठसा उमटविला आहे. पत्रकारितेत योगदान देतांना त्यांनी दैनिक सत्यप्रभाची पुनर्बांधणी केली. मराठवाड्यात सत्यप्रभासारखे देखणे कार्यालय कुठेही नाही इतकी चांगली वास्तू त्यांच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून निर्माण झाली आहे.

निर्भीड, मितभाषी, संयमी, अभ्यासू आणि सहनशीलता अंगी असलेल्या संतोष पांडागळे यांना निश्चितपणे उज्ज्वल भविष्य आहे, असे मतही सावंत यांनी व्यक्त केले. पांडागळे यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी शुभेच्छाही त्यांनी दिली.

दरम्यान, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, पत्रकार संजय सूर्यवंशी, पत्रकार जयपाल वाघमारे यांनाही वाढदिवसानिमित्त माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. आ.मोहनआण्णा हंबर्डे,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे,जगदीश जोगदंड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय लहानकर , सुभाष लोने, गटशिक्षाधिकारी बालाजी शिंदे, विलास शिंदे, पंढरीनाथ बोकारे,कमलाकर बिरासदार, प्रवीण खंदारे, कुलदीप नंदुरकर यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मराठी पत्रकार संघ, महानगर मराठी पत्रकार संघ यांनी परिश्रम घेतले.

अशोकरावांचा विश्वास जिंकणे, हीच मोठी कमाई :

आ. हंबर्डे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा विश्वास जिंकणे, हीच सर्वात मोठी कमाई असून ही कमाई काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केली आहे. त्यामुळे भविष्यात संतोष पांडागळे यांचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील प्रवास अधिक बळकट होईल, अशी सदिच्छा आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमास शहरातील पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *