ती बाल्कनीत उभी होती.. हातात मोबाईल , पेन अशा गोष्टी होत्या. मोबाईल ठिक आहे पण ती हातात पेन घेउन का उभी राहील ना ??..
अगदी बरोबर.. हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.. प्रश्न पडायलाच हवेत .. ती लेखिका होती का ??.. आजिबातच नाही.. आता लेखक सुध्दा मोबाईल किवा लॅपटॉप वर लिहीतात..
मग तिच्या हातात शाईचं पेन का असेल बरं ??.. तिला तिच्या नवऱ्याची मस्करी करायची हुक्की आली.. तो पांढरा टीशर्ट घालुन दुध आणायला गेला होता .. तो परत आला की त्याच्या अंगावर शाई उडवायची आणि घरात पळुन जायचं असा रोमॅन्टिक प्लॅन तिने केला.. ढग दाटुन आले होते.. कधीही पाऊस पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती..
तितक्यात तिला मित्राचा फोन आला .. फोनवर बोलायला सुरुवात केली तितक्यात राहुल ( नवरा ) तिकडुन येताना दिसला.. तिने त्याच्या अंगावर शाई उडवायला पेन वर केला आणि त्याचक्षणी सोसायटीतील एक मुलगा तिथुन जात असताना त्याच्या अंगावर शाई उडाली आणि पेनही बाल्कनीतुन खाली पडलं.. तिने घाईगडबडीत फोन कट केला आणि त्या पेनाच्या दिशेने पाहु लागली..
सोसायटीतील तो तरुण मुलगा शहारला.. त्याला वाटलं कोणीतरी मला टार्गेट केलय त्याने वर पाहिलं तर स्नेहा बाल्कनीत दिसली.. तिचे वाऱ्याने उडणारे केस सावरत ती इकडे तिकडे पहात राहीली आणि तो ??..
तो विचार करत होता , अरेच्चा इतके दिवस जे मला जमले नाही ते या शाईने केले.. पेन पेंसील फळ्यावर आपले नशीब लिहीतात.. आपले फ्युचर यानेच तर ठरते आणि इथे तर माझं भाग्यच उजळलं. खुप दिवस त्या हॉट लेडीशी बोलायला तो तरसत होता.. तिने तिच्या मंजुळ आवाजात sorry म्हटलं पण त्याच्या कानावर sorry ऐवजी I like You गेलं आणि त्याच्या तोंडुन निघालं same here तो काय म्हणाला ते शब्द वाऱ्यामुळे तिला ऐकु गेलेच नाहीत .. तिला वाटलं त्याने माफ केलय .. तितक्यात घराची बेल वाजली म्हणुन ती टेरेसवरुन हॉलमधे गेली .. नवरा दुध घेउन आला .. सोबत खारी आणली . तिने किचन मधे जाऊन कॉफी केली आणि दोघेही कॉफीचा मग हातात घेउन बाल्कनीत उभे राहिले.. पावसाचे शिंतोडे पडायला सुरुवात झाली होती.. तो मुलगा पार्कींग मधे तसाच रेंगाळत होता.. तिने रील करायला सुरुवात केली आणि पुढे काय झालं असेल ??.. अहो सकाळ झाली.. तो खडबडुन जागा झाला.. पहातो तर काय तो घरीच होता.. त्याच्या बहीणीने तोंडावर शाई ऐवजी पाणी मारले होते…
स्वप्नं जरुर पहावीत कारण ती पूर्ण होतातच.. माझा यावर पूर्ण विश्वास आहे पण अशी स्वप्नं नकोत ना.. स्वप्नंअशी असावीत ना की भगवंतालाही ती गोष्ट आनंदाने आपल्याला द्यावी वाटेल..
हरे कृष्ण..
सोनल गोडबोले..