नांदेड : आयुष्यामध्ये कुठलेही क्षेत्र हे कमी महत्त्वाचे नाही. निर्मिकाने आपणास पाठवताना कुठले ना कुठले कलागुण देऊन पाठविले आहे. ते कोणते गुण आपल्याकडे आहेत ते ओळखा व त्यात अंतरंग मिसळा. शिक्षण घेऊन आई-वडिलांना विसरू नका जीवनात संकटे, अपयश येतात त्याने खचून जाऊ नका.नवी उभारी घेऊन कार्यरत रहा. प्रत्येक क्षेत्रात यश निश्चितपणे प्राप्त होते. फक्त त्यात अंतरंग मिसळून अभ्यास करण्याची गरज आहे असे प्रतिपादन साहित्यिक तथा प्रसिद्ध वक्ते प्रा.डाॅ. रामकृष्ण बदने यांनी शिवाजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिकनगर, नवीन कौठा नांदेडच्या वतीने घेण्यात आलेल्या मातोश्री स्व. सौ. सुलोचनाताई गुरूनाथराव कुरूडे स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2023 च्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
या वेळी सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी अध्यक्षीय समारोप करताना आपल्या यशाचे रहस्य विधार्थ्यासमोर उलगडले. अपयश आले तरी खचू नका, यशासाठी प्रयत्नशील राहा मीही माझ्या जीवनात काही परीक्षेत नापास झालो, पण यशाचे शिखर गाठलेच. मी यशस्वी होणार असा आशावाद बाळगा. असा महत्वाचा संदेश त्यांनी दिला.
समारंभासाठी संस्था सचिव, माजी आमदार भाई गुरूनाथराव कुरूडे, संस्था सदस्य प्रा. वैजनाथराव कुरूडे, शालेय समिती सदस्य सुर्यकांत कावळे, सोनखेडचे मुख्याध्यापक भगवानराव पवळे, सहित्यिक प्रा. महेश मोरे, विजयसिंह परदेशी, विद्यालयाचे प्राचार्य सुधीर कुरूडे, उपमुख्याध्यापक देविदास कदम, उपप्राचार्य प्रा. डॉ. मधुकर शिंदे, प्रा. मुख्याध्यापक दिलीप वाडेवाले, शहाजी आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
दोन गटामध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठया गटात प्रथम कु. प्रिया वसंत पाटील, संत – गाडगे महाराज हायस्कूल लोहा, द्वितीय – कु. सुप्रिया माधव शेंबाळे, श्री शिवाजी उ.मा. विद्यालय सोनखेड, तृतीय- कु. ऋतुजा दीपक पाटील, संत ज्ञानेश्वर उ.मा. विद्यालय धुप्पा. लहान गटात प्रथम कु. दीक्षा प्रकाश गजभारे, म.न.पा. शाळा क्र. 1. वजिराबाद नांदेड, द्वितीय – कु. कोमल वामनराव गाडवे, प्रियदर्शिनी मा. कन्या शाळा, कंधार, तृतीय कु. शर्वरी शंकरराव वडवळे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल नांदेड या विजेत्यांना मान्यवरांच्या – हस्ते सन्मानित करण्यात आले.
समारंभाची सुरूवात वंदेमातरम् गीताने झाली. प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी आपल्या आई – वडिलांचे पूजन करून आदर्श ठेवला. हा नेत्रदिपक सोहळा पाहून सभागृह भारावले. पाहुण्यांचा परिचय प्रा. स्वाती कान्हेगावकर यांनी दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्व. सुलोचनाताईंच्या जीवनचरित्रावर विचार मांडले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई गुरूनाथराव कुरुडे यांनी आपल्या पत्नी स्वर्गीय सौ. सुलोचनाताई यांनी संस्थेसाठी मोठे योगदान दिल्याचे सांगूण कृतज्ञता म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे मत व्यक्त केले. या स्पर्धेत जिल्ह्यातून मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून त्यांनी जिल्ह्यातील शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे ऋण व्यक्त केले.
समारंभाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक सदानंद नळगे, प्रा. वसंत राठोड, इंद्रजित बुरपल्ले, प्रा. जमील सयद, प्रा. संगीता स्वाती, प्रा. रूपाली कळसकर, प्रा. दिपाली जामकर, बालाजी टिमकीकर, सचिन कळसे, गुरूप्रसाद विश्वासराव, सत्यवान पारेकर, प्रा. ज्ञानेश्वर लुंगारे, प्रा. योगेश दिग्रसकर, अनिल हातने, शैलेश भांगे, आनंद सुरसे, सौ. मोहिनी दिनकर, प्रा. जयवंत यानभुरे, व्यंकट उपासे, सुशिल कुरूडे, पंढरीनाथ काळे, अपर्णा लाडेकर, विजयाताई कुरूडे यांनी परिश्रम घेतले.
समारंभाचे सुत्रसंचालन पर्यवेक्षक शिवराज पवळे व डॉ. कविता तिर्थे यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक डी. पी. कदम यांनी मानले. समारंभासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. समारंभाची सांगता सामुदायिक राष्ट्रगीताने झाली.