1930 सालामध्ये माळेगाव यात्रा हे गाव निजाम राजवटीमध्ये होते या ठिकाणी निजामाने नेमून दिलेले जागीरदार, मुजुमदार कारभार बघत होते
1935 ला जाहागीरदाराची 205 एकर जमीन नांदेड लोकल बोर्डाला-
खंडोबाची यात्रा भरवण्यासाठी लिज वर देण्यात आली यावर तत्कालीन काळातील चार शेतकरी सदस्याच्या सह्या आहेत
1) मल्हार पिता रावजी पाटील( गुरव)
2)गंगुबाई भद्र बापूजी पाटील गुरव 3) दगडू मल्हारराव पाटील (गुरव )
4)सुगंधाबाई भद्र मल्हारराव पाटील (गुरव)
1935 ला लोकल बोर्ड होते व ते पुढे जिल्हा परिषदेमध्ये रूपांतरित झाले हा करार शंभर वर्षासाठी झाला असल्याची माहिती समोर येत आहे .
दक्षिण भारतात प्रसिद्ध अशा श्रीक्षेत्र माळेगाव येथे निजामकालीन (बंगला )सध्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेस्ट हाऊस आहे त्याचप्रमाणे गावात सटवाई मंदिर ,सटवाई तलाव , महादेव मंदिर ,अंबादास महाराजांचा मठ ,बाळूमामाचे देवस्थान ,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ,अहिल्याबाई होळकरांचा पुतळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा ,बौद्ध विहार, व भव्य दिव्य खंडोबाचे मंदिर आहे.
माळेगाव यात्रा गावाला निजाम काळापासून इतिहास आहे माळेगावच्या डाग बंगल्यावर अनेकदा निजाम व त्यांचे सेनापती सैनिक थांबलेले आहेत असे सांगितले जाते 1947 /1948 ला ज्यावेळेस रजाकार झाला त्याप्रसंगी निजामाचा अत्यंत विश्वासू सेनापती काशीम रिझवी हा लातूर जिल्ह्यातील औसा या ठिकाणचा राहणार असल्याने त्यांनी कंधार व परिसरातील लोकांशी त्या काळातील स्वतंत्र सेनानी सोबत चकमकी( लढाया )झाल्या आहेत .
माळेगांव यात्रा येथील सरपंच-
*1962-* मध्ये माळेगावचे सरपंच म्हणून बाबाराव शामराव फुलारी यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली
*1967-*मध्ये माळेगावचे दुसरे सरपंच मल्हारी मारोतराव धुळगुंडे यांची सुद्धा बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली .त्या काळात उपसरपंच म्हणून रामलिंग औरादे होते
1972 ला फौजी मारुती हैबती
भागानगरे यांची मतदानामधून निवड करण्यात आली व शेषराव घोरपडे नागोराव शंकर भोरे हे त्यांच्या विरोधात होते व माधवराव गौकोंडे उपसरपंच
*माधवराव गौकोंडे हे माळेगांव चे पहिले पंचायत समिती सदस्य होते-*
1977 ला पिराजी नवसाची धुळगंडे यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड करण्यात आली त्याप्रसंगी रामलिंग आप्पा औरादे हे उपसरपंच पदी होते 1982 ला पंडित तुळशीराम पाटील यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली या प्रसंगी संतोबा गोविंद धुळगंडे हे उपसरपंच पदी होते
1987 ते 1992 रुस्तम राव धुळगंडे यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली यावेळी उपसरपंच म्हणून गोविंद पवार लछ्मा तांडा येथील होते
1992 ते 1997 रुस्तमराव धुळगंडे सरपंच व उपसरपंच पदी शिवाजी घोरपडे यांची निवड केली होती
*जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व मार्केट कमिटी लोहाचे सभापती म्हणून रुस्तुमराव यांनी काम पाहिले आहे-*
1997 ते 19 99 वाढीव दोन वर्ष रुस्तुराव धुळगंडे यांना भेटले व उपसरपंच म्हणून गोविंद नाईक पवार लछ्मा तांडा हेच होते
1999 ते 2004 मध्ये रुस्तमराव धुळगुंडे बिनविरोध सरपंच राहिले त्यांनी तब्बल सतत सतरा वर्ष या माळेगावची सरपंच म्हणून काम पाहिले आहे 1999 ते 2004 च्या दरम्यान उपसरपंच म्हणून बालाजी सिदुसरे हे होते
राखिव 2004 ते 2009 नागोराव सोपान वाघमारे हे मतदानामधून निवडून येऊन सरपंच पदी विराजमान झाले उपसरपंच पदी रुस्तुमराव धुळगंडे होते त्यांच्या नऊपैकी नऊ जागा यावेळी विजय झाल्या होत्या 2009 ते 2004 सार्जाबाई नारायणराव धुळगंडे हे मतदानातून सरपंच पदी निवडून आल्या व त्यांनी नऊ पैकी सहा जागा विजय करून आणल्या होत्या उपसरपंच म्हणून निलुबाई गोलंदास वाघमारे या होत्या यावेळी मात्र विरोधकाकडून त्यांच्यावर विश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न झाला पण याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विजय वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य व गणपत राठोड यांनी हा विश्वासाचा ठराव येऊ दिला नाही हे एक विशेष बाब आहे .
2014 ते 2019 ला गोविंदराव कंटिराम राठोड हे गरीब सरपंच मतदानातून निवडून आले व त्यांनी 11 पैकी सात जागा विजयी निवडून आणल्या उपसरपंच पदी सुंदरबाई पंडितराव धुळगंडे या होत्या मध्यंतरीच्या काही दिवस प्रशासक होते मालेगावच्या ग्रामपंचायत वर 2020 मध्ये मतदानातून कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे या सरपंच पदी निवडून आल्या उपसरपंच पदी बालाजी दिगंबर नंदाने हे होते त्यांनी 11 पैकी आठ जागा निवडून आणल्या व त्यांच्या विरोधी पॅनल मध्ये बालाजी राठोड यांचे पॅनल होते ते आजतागायत.
*काही ठळक वैशिष्ट्य आणि व्यक्ती -*
दत्ता कुलकर्णी ,सुभेदार कुलकर्णी ,बाबाराव सुरनर, कंधारचे नळगे आदींचा व माळेगावचे जाहागीरदार यांचा दबदबा व कब्जा माळेगाव येथील जमिनीवर व लोकांवर असल्याची माहिती आहे.
*1930 ते 1950 द्विशतकातील ठळक व्यक्तींची नावे-*
———————————————-
गंगाराम धुळगंडे, मारुती धुळगंडे ,गणपती धुळगंडे,सदाशिव गंगणे ,गुरु आप्पा आंधळे, माधव इरबाजी वाघमारे, मसाजी वामन वाघमारे ,संतराम वाघमारे, गोविंद वाघमारे ,निवृत्ती वाघमारे, खेत्रुजी वाघमारे ,सुदाम वाघमारे, संभाजी वाघमारे, गंगाराम जोशी, तुळशीराम जोशी, रामा नंदाने ,रंगनाथ कोमटे ,बाबाराव भागानगरे, बापूराव धुळगंडे, रामचंद्र पाटील आदी जुनी मंडळी यांनी या गावावर कारभार केलेला आहे.
*माळेगाव येथील पोलीस पाटील -*
————————————-
माळेगावचे पहिले पोलीस पाटील ढालजी पाटील हे होते तर दुसरे पोलीस पाटील म्हणून दत्ता पाटील यांची निवड झाली होती व तिसरे पोलीस पाटील म्हणून हरी गंगाराम वाघमारे यांची निवड झाली होती .
*स्वातंत्र्याच्या काळामध्ये खंडोजी आबाजी पाटील (गुरव ) यांनी गावावर दुष्काळ पडला मन्याडचे पाणी पिण्यासाठी वापरण्याची वेळ आली त्या काळात पंचमीच्या सणाला लोकांना सण नव्हता व अन्नधान्याचा तुटवडा होता त्या काळात सर्व गावकऱ्यांना आव्हान केले माझ्याजवळ जे आहे सर्वांनी घेऊन जा व सण साजरा करा जगलो तर आपण सगळे जगू हा संदेश त्यांनी गावाला यांनी दिला व खंडोजी पाटलांनी पूर्ण गाव वाल्यांना पुरणपोळीचे जेवण दिल्याची बाप या ठिकाणी समोर आली आहे –
माळेगाव हे बहुजणांचे गाव आहे-
—————————————-
गुरव, हटकर , बौद्ध,बंजारा, भोई, जोशी ,लिंगायत वाणी ,तेली ,फुलारी, घिसाडी ,कैकाडी ,कुंभार ,होल्हार,
मातंग ,सोनार, सुतार ,वारिक,आदी जातींचा समावेश आहे
*माळेगावात वर्षातून तीन वेळा पालखी सोहळा -*
—————————————-
1) दसरा
2) चंपाषष्ठी
3) मार्गशीष दर्श अमावस्या (येळवस आमवस्या)
या वेळेस माळेगावात यात्रेचा मोठा उत्सव असतो
* माळेगाव येथील वाघे मंडळी-*
चिमाजी धनगर ,धोंडीबा धनगर, नारायण धनगर, जयराम वाघमारे, संतराम वाघमारे, सोपान वाघमारे ,किसन वाघमारे, पांडुरंग वाघमारे, विठ्ठल वाघमारे ,तुळशीराम होनमाने ,मालू वाघमारे, गंगाधर वाघमारे,
यात संतराम वाघमारे हे अति माहिती गार वाघे म्हणून माळेगाव व माळेगाव परिसरामध्ये प्रसिद्ध होते .
मार्गशीर्ष अमावस्येला माळेगाव यात्रा येथे मोठा यात्रा महोत्सव होतो यात वाघ्या ,मुरळी ,वारू ,घोडे, उंट, गाढव देवणी व लाल कंधारी गाई वळू, श्वान ,माकड ,विविध पक्षी पशु व मोठ्या प्रमाणात गरम कपड्याचा बाजार, कारपेट ताडपत्री बाजार ,भांडे सायकल मोटरसायकल लहान मुलांच्या कार शैक्षणिक सामाजिक बचत गटाचे स्टॉल असतात.
यात्रेमध्ये भटक्या समाजाची जात पंचायत भरते-
——————————————
वर्षातून एकदा या लोकांची भेट माळेगावच्या यात्रेमध्ये होते हे भटक्यांचे पीठ म्हणून माळेगाव ओळखले जाते. वैदु ,घिसाडी ,वडार ,मसनजोगी ,फासिपारधी, पारधी,वासुदेव, राइंदर, डौरी गोसावी ,चुडबुडके वाले,व अनेक भटकंती करणारे पालावर राहणारी मंडळी या यात्रेमध्ये येऊन आपल्या आप्तेष्टांना सोयऱ्याधार्यांना भेटतात यांच्या याच ठिकाणी जातपंचायती सुद्धा होते व त्यामध्ये त्यांचे संसार जोडणे संसार मोडणे सोयरीकी होणे या अशा अनेक गोष्टी यात्रेमध्ये घडतात.
*माळेगाव मध्ये मुकेश सैनी यांची नुमाईश डोळ्याचे पारणे फेडणारी -*
——————————————
मोठे मोठे उंच आकाशी पाळणे ,चक्री मौत का कुंवा ,ब्रेक डान्स, जादूगर ,सर्कस, पन्नालाल गाढवाचा खेळ, बोटिंग ,लहान लेकरांच्या कार मोटर सायकल इत्यादी वस्तू या यात्रेकरूंना आकर्षित करून घेणाऱ्या असतात
या ठिकाणी महिलांचा वस्तूंचा मिनी बाजार लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने यांचा मोठा बाजार भरतो
*माळेगाव यात्रेमध्ये उच्चभ्रू लोकांच्या घोड्यांच्या राव्हट्या-*
माळेगाव खंडोबाचे परमभक्त दगडोजीराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे वडील यांची राव्हटी व घोडी दरवर्षी माळेगावच्या यात्रेत येत असते त्याचप्रमाणे उच्चभ्रू लोकांच्या घोडी घोडे व त्यांच्या राव्हट्या असतात लातूरचे देशमुख, परळीचे मुंडे ,परभणीच्या फौजिया खान ,राणा जगजीत सिंह ,मोहिते पाटील ,बारडकर ,कुंटूरकर, कराड ,जाधव, पाटील, देशमुख, देशपांडे,अशा बड्या व्यक्तींच्या राव्हट्या असतात
या मध्ये सर्व सोयीने सज्ज असतात व या ठिकाणी पंधरा दिवस खाण्यापिण्याची आप्तेष्टांची चंगळ असते.
*माळेगाव यात्रेमध्ये विविध देवदेवतांच्या मूर्तीचे स्टॉल, कुंकाचे व्यापारी, घोड्याचा साज ,बैलांचा साज, छोटे व्यापारी, गोंदन करणारे ,माळी विकणारे ,मिठाईची दुकाने खवयासाठी लेवड्या, बत्ताशा ,बर्फी, चिवडा ,भजी, केली व जिलेबी ची पर्वणी असते.
*माळेगाव यात्रेत सर्व राजकीय पक्षांची वर्दळ-*
माळेगाव यात्रा म्हणजे फुकटचा प्रचार या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात होतो महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा राजस्थान उत्तर प्रदेश देशातील विविध राज्यातून लोक येतात व नांदेड लातूर परभणी उस्मानाबाद बीड हिंगोली वाशिम अकोला यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोक येतात
ज्या पक्षाचे माळेगाव यात्रेत जास्तीत जास्त बॅनर लागतील त्यांचे वातावरण बरे आहे अशी लोकांची समज आहे म्हणून प्रत्येक पक्ष आपली बॅनरबाजी जास्त कशी होईल याची स्पर्धा करतात यात्रेत युवा नेत्यांची पण चढावढ असते काही छोटे-मोठे पक्ष यात्रा काळात सभा घडून आणतात व आपला परिसरामध्ये कसा ठसा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात.
*माळेगाव यात्रेची सुरुवात ‘खंडोबा ‘ देवाच्या देव स्वारीने( पालखी) होते -*
यावेळी जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद अध्यक्ष, खासदार, आमदार व जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे सभापती परिसरातील नेते मंडळी गावकरी मंडळी भक्तगण भाविक वाघ्या मुरळी वारू मानकरी उपस्थित राहतात.
*खंडोबा मंदिराचे ट्रस्टी-*
वसंतराव पाटील हे सुरुवातीला वन मॅन ट्रस्टी होते त्यानंतर त्यांचाच मुलगा रावसाहेब वसंतराव पाटील हे अध्यक्ष झाले
त्यानंतर विस्तार करून पाच सदस्य ट्रस्टी तयार करण्यात आली यावेळी दयानंद वसंतराव पाटील हे अध्यक्ष झाले आजतागायत……
*यात्रेचे मानकरी-*
माळेगाव यात्रेच्या वेळी खंडोबाचे सर्व मानकरी उपस्थित असतात .
भोसीचे भोस्कर ,शिराढोणचे पांडागळे ,रिसनगावचे नाईक ,कुरळ्याचे महाजन ,माळेगावचे पाटील, आदींचा मान खंडोबा देवस्थान येथे आहे.
पालखी धरण्याचा मान माळेगाव येथील भोई समाजाला आहे नंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळी कार्यक्रम असतात.
*पशुप्रदर्शन-*
दुभत्या गाई,म्हशी लाल कंधारी गाई,वळू देवणी गाई,वळू छोटे मोठे प्रकार यात प्रत्येक स्पर्धकांना येण्या-जाण्यासाठी किराया व खावटी
व नंबर मिळविणाऱ्या स्पर्धकांना बक्षिसे जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडून दिली जाते.
कुस्ती-
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नांदेड, यवतमाळ, परभणी, लातूर, हिंगोली, परिसरातील व राज्यातील मल्ल (पैहेलवान) भाग घेतात प्रतेक जोडित एकाला बक्षीस व शेवटच्या कुस्ती साठी चांदिची गद्दा रोख 3100 हाजार रूपये बक्षीस पंचायत समिती लोहा यांच्या नियोजना खाली आसते.
*कृषी प्रदर्शन-*
यात शेतकरी कृषी प्रर्दशनात आपल्या शेतातील उच्च प्रतीचे व चांगले पिक प्रदर्शनात घेऊन सहभागी होत असतो वांगी, टोमॅटो,मिरची, ज्वारी,कापूस,तुर, सोयाबीन,हरबरा,मसुर,भेंडी,गोबी,
आसे विविध प्रकारचे पिके व शेती उपयोगी उपकरणे सुधा या कृषी प्रदर्शनात घेऊन सहभागी होत असतात प्रत्येक शेतकऱ्यांना काहीना काही सहभाग म्हणून जिल्हा परिषद नांदेड काही प्रोत्साहन पर बक्षिसे व निवड केलेल्या स्पर्धकांना विषेस बक्षिसे देते.
*विविध स्टॅल-*
—————-
शैक्षणिक जनजागृती , माहिती उपक्रम शैक्षणिक धोरण पुस्तके,आशा आनेक ,विषयावर मार्गदर्शन, बचत गट, सामाजिक उपक्रम, रोगराई,घडलेल्या घटना घडामोडी वर प्रकाश टाकणारे कार्यक्रम या प्रसंगी उपस्थित केले जातात.
*कलामोहत्सव-*
महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून कलाकार कलामोहत्सवात सहभागी होतात
वाघे, शाहिर, हास्य विनोदवीर, पोवाडे गाणारे कलाकार,भारूड भावगिते,लोकगिते,भजन पार्टी ,व डिस्को डान्सर,लावणी कलाकार,मोठे तमाशा मंडळ त्यात 1) रघुवीर खेडकर,मंदारानी, तमाशा मंडळ
2) चंद्रकांत ढवळपुरीकर तमाशा मंडळ
3) काळू,बाळू तमाशा मंडळ
4) पांडुरंग मुळे तमाशा मंडळ
5) हारी भाऊ, रतन, उत्तम तमाशा मंडळ
6) कुंदा पाटील तमाशा मंडळ
7) आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ
8)भिका भिमा लोकनाट्य तमाशा मंडळ
आशे अनेक मंडळ कलाकार भाग घेतात
1980 ते 1990 च्या दशकात बि डी ओ शिदे हे कंधार पंचायत समिती ला आले परीसरात त्यांनी आने पाटील ,पांडे, मोठे व्यापारी, कारखानदार यांच्याशी संपर्क करून वर्गनी जमा करून कलामहोत्सव सुरवात केला आज मोठ्या फडांना 50,000 हाजार व लहान कलाकारांना
500,1000,2000 आशे बक्षिसे दिली जातात .
*लावणी महोत्सव-*
लावणी महोत्सव 2011/2012 मध्ये नांदेड जिल्हा परिषद चे तत्कालीन अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर , उपाध्यक्ष गबा राठोड,आर्थ व आरोग्य सभापती प्रवीण प्रतापराव पाटील चिखलीकर, शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे, केरबा धुळगंडे, विजय कुमार वाघमारे यांनी दोन दिवसात निर्णय घेतला व लावणी महोत्सवाला सुरुवात झाली .
यात प्रामुख्याने सुरेखा पुणेकर, सुलोचना चव्हाण आशा मोठ्या कलाकारांसोबत महाराष्ट्रातील अनेक नावाजलेल्या लावणी कलावंत सहभागी होतात सध्या आकलुज च्या लावणी महोत्सवाला मागे टाकत माळेगांव यात्रा लावणीचा महोत्सव भरभराटी ला आला आहे
या साठी स्वतः पोलिस विभागाचे यात्रा इन्चार्ज जातीने उपस्थित राहतात आमदार खासदार मंत्री बडे नेते या सह मोठी मंडळी लावणीचे दर्दी रसीक बायका मुल रसीक यात्रेकरू उपस्थित राहतात लावणी महोत्सवानेच माळेगांव यात्रेची सांगता होते.
कुस्त्या कृषी प्रदर्शन विविध स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होते कला महोत्सव लावणी महोत्सव या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिक असते लावणी महोत्सवाने या यात्रेची सांगता होते पण व्यापारी व नुमेशवाले जितके दिवस थांबतील तोपर्यंत यात्रा चालूच असते लाखो रुपये किमतीचे घोडे या यात्रेत येतात कार्पेट सतरंजी ताडपत्री गरम कपड्याचे दुकाने यांचा कोट्यावधी रुपयांची उलाढाल या यात्रेमध्ये होते पानिपत गुजरात मुंबई दिल्ली खूप दुरून धरून व्यापारी या यात्रेमध्ये आपला भरमसाठ असा माल घेऊन येतात गावकऱ्यांना व व्यापाऱ्यांना महिन्याभरापूर्वी यात्रेची तयारी करावी लागते या देवस्थान व माळेगाव ग्रामपंचायत ,पंचायत समिती लोहा ,व जिल्हा परिषद नांदेड यांचा सहभाग असतो महाराष्ट्रातील एकमेव जत्रा अशी आहे की ही जिल्हा परिषद भरवते माळेगावची यात्रा नांदेड जिल्हा परिषदे कडून नियोजन केले जाते यामध्ये जिल्हा परिषदेचे सर्व विभाग सर्व सोयीसाठी तयार असतात जि पकडून प्रत्येक विभागाला निधी उपलब्ध होतो महाराष्ट्र शासनाचे 25 लाख जिल्हा परिषदेचे 75 लाख असा एक कोटीच्या जवळपास खर्च या यात्रेवर शासन करतो
*संगीत बारी-*
माळेगांव यात्रा येथे सुरवातीला झोपडितले,पालातले नाचगाणी कार्यक्रम असायचे 1 रूपया, 2 रुपये,5 रुपये गाणे तोडण्याचा कार्यक्रम होत असत आशाबाई काटकळंबेकर,सिमाराणी परभणीकर,आशा अनेक कलाकारांनी माळेगांवच्या रसिकांची मने जिंकली आहेत.पुढे प्रगती होवून स्टेज शो सुरू झाले आजतागायत….
पूर्वी काळापासूनच संगीत बारी लोकनाट्य तमाशा मंडळ या यात्रेचे मुख्य आकर्षण राहिले आहे यात्रेला हजारो वर्षाचा इतिहास आहे पण आज तगायत या यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडला नाही खंडोबाचे देवस्थान नवसाला पावणारे व जलजलाट आहे अशा भाविकांच्या भावना प्रतिक्रिया येतात या यात्रेत हजारो व्यापारी येतात व सर्व धर्मीय लोक हिंदू मुस्लिम सीखी साई बौद्ध येतात व व्यापार झाल्यानंतर खंडोबाला भक्तिभावाने खोबर भंडारा उधळून जातात ही यात्रा सर्व धर्मीय व सर्व जाती आहे यात कुठलाही भेदभाव नाही हे विशेष
*माळेगाव यात्रेला भरभराटी-*
—————————————–
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे वडील दगडूजीराव देशमुख यांच्या समवेत माळेगाव यात्रेत विलासराव लहानपणापासून यायचे त्यामुळे त्यांनी या यात्रेला राज आश्रय मिळवून दिला व मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला.
तत्कालीन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विसरावांच्या माध्यमातून या देवस्थानाला क दर्जा प्राप्त करून घेऊन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला तब्बल साडेपाच कोटी रुपयांचा निधी विलासरावांच्या काळात माळेगाव देवस्थानाला मिळाला विलासराव गेल्यानंतर देवेंद्र फडवणीस हे माळेगाव येथील धनगर मेळाव्याला उपस्थित होते तत्कालीन काळामध्ये गणेश हाके, चंद्रसेन पाटील ,बालाजी राठोड , राजेंद्र पाटील, विजय कुमार वाघमारे,केरबा धुळगंडे,यांच्या माध्यमातून धनगर मेळावा घेतला होता.
पुढे प्रताप पाटील चिखलीकर यांनी या निधीचा पाठपुरावा करून निधी माळेगावला मिळवून दिला साडेपाच कोटींचे साडेसात कोटी रुपये माळेगाव यात्रेला चिखलीकर यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाले ही यात्रा यशस्वी होण्यासाठी अधिकारी वर्गांचाही सहभाग आहे वि ना कळम पाटील, जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार ,जिल्हाधिकारी कुशवाह ,जिल्हाधिकारी तानाजी सत्रे ,मुख्य कार्यकारी अधिकारी परिमल सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी हार्डिकर,मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मेघमाळे ,शरद कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी शिनगारे, पोलीस अधीक्षक अमिताभ गुप्ता, रवींद्र सिंगल, विजयकुमार मगर ,आदी अधिकाऱ्यांनी ही यात्रा वाढवण्यासाठी मोलाचे सहकार्य केलेले आहे
*जसे भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत तसेच बारा खंडोबाचे सुद्धा बारा ठिकाण आहेत यात जेजुरी नंतर माळेगावच्या खंडोबाचे स्थान महत्त्वाचे आहे-*