कंधार ; दिगांबर वाघमारे
कंधार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी स्थापित असलेल्या हुतात्मा स्तंभाची दुरावस्था झाली असून भारतीय स्वातंत्र्य मध्ये ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले त्यांची नावे सुद्धा पुसल्या गेले असल्याचे लक्षात आल्याने नगरपालिका प्रशासनाचा आज दि .१२ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी दिले पालीका प्रशासनाला निवेदन निषेध करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन वर्षभर करण्यात आले
१५ ऑगस्ट १९७२ रोजी कंधार शहरातील छ शिवाजी महाराज चौक या ठिकाणी हुतात्मा स्तंभ भारत सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आला होता . त्यावेळेस भारतीय स्वातंत्र्यास पंचवीस वर्षे पूर्ण झाली होते, आता आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतो गेल्या वर्षभरामध्ये नगरपालिका प्रशासनास किंवा तहसील प्रशासनाचे या हुतात्मा स्तंभाकडे लक्षही गेलं नाही त्यामुळे या स्तंभाची दुरावस्था झाली तर यावर कोरीव असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची नावे ही मिटल्या गेलेली आहेत .
त्याचबरोबर या स्तंभाच्या पाठीमागील बाजू भारतीय संविधानाचे प्रास्ताविक कोरले गेलेले आहे प्रास्ताविकाची कोरीव बाजू सुद्धा ही पुसल्या गेलेली आहे ही बाब लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी ही बाब नगरपालिका प्रशासनास लक्षात आणून देऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला .
यावेळी भाजप सोशल मीडियाचे अड सागर डोंगरजकर ,पंडित ढगे, बापूराव कल्याणकर यांची उपस्थिती होती.