बोरी खुर्द येथे सैनिकाने गरोदर पत्नीचा आणि मुलीचा गळा आवळून केला खून, चौघांवर माळाकोळी पोलिसात गुन्हा दाखल

कंधार: (  प्रतिनिधी विश्वांबर बसवंते )

  बोरी (खुर्द)तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील भारतीय सैनिकांनी स्वतःची पत्नी व चार वर्षाची मुलगी यांचा गळा दाबून खून करून स्वतः माळाकोळी पोलीस स्टेशन येथे हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिल्याची घटना दि. १३ सप्टेंबर २०२३ रोज बुधवारी घडली आहे

 

    या विषयी सविस्तर माहिती अशी की राजस्थान बिकानेर येथे कर्तव्यावर असलेले भारतीय सैनिक एकनाथ मारुती जायभाये वय ३२ वर्ष राहणार बोरी (खुर्द) तालुका कंधार यांनी स्वतःची पत्नी भाग्यश्री एकनाथ जायभाये पत्नी वय २५ वर्ष, ८ महिन्याची गर्भवती होती, तर ४ वर्षाची मुलगी सरस्वती एकनाथ जायभाये यांचा गळा दाबून खून करून, माळाकोळी येथील पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर राहून गुन्ह्याची कबुली दिलीआहे. 

 

     रात्री घडलेला सर्व प्रकार आरोपीने स्वतः सासरवाडीला फोन करून स्वतःच्या मेहुणीस सांगितला. आरोपीने फोनवरून आरेरावीची भाषा केली, आरोपीने स्वतःच्या मेहुणीस फोन करून तुझी बहीण व छोट्या मुलीला मी मारले आहे. असे माहिती फोनवरून   मयताच्या बहिणीने दिली. मयतांच्या नातेवाईकांनी मंगळवारी आरोपी एकनाथ मारुती जायभाये यांनी आपली मयत गर्भवती पत्नी भाग्यश्री एकनाथ जायभाये, व मुलगी सरस्वती एकनाथ जायभाये यांना कंधार येथील बाजारात फिरताना, काही नातेवाईकांनी बघितले, मयताच्या नावे असलेले बँकेतील पैसे आरोपीने उचलून सायंकाळी ही घटना आरोपीच्या वतीने घडविण्यात आली.

 

   मयताच्या नातेवाईकाकडून आरोपीच्या वतीने शेती व घर बांधण्यासाठी पैशाचे मोठ्या प्रमाणात मागणी केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
कंधारचे पोलीस उपविभागीय अधिकारी मारुती थोरात यांचे मार्गदर्शनाखाली माळाकोळी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार हे पुढील तपास करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *