कंधार ; प्रतिनिधी
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजू टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली आज 13 सप्टेंबर 2023 रोजी आयुष्यमान भव:योजनेचे उदघाटन कंधार येथील सामाजिक कार्यकर्ते अभिवक्ता मारोती पंढरे यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रातील धन्वंतरी देवतांची पूजा करून कार्यक्रमाला सुरवात ठिक 1:30 वा करण्यात आले.
या कार्यक्रमाबाबतिची सविस्तर माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजू टोम्पे यांनी सांगितली.या मध्ये प्रामुख्याने आयुष्यमान कार्ड बनवणे स्वच्छता अभियान राबविणे,आयुष्यमान मेळाव्याचे आयोजन करणे,
रक्तदान शिबीराचे आयोजन करणे, तसेच अवयवदान जनजागृती करणे, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध्ये 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करणे, इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमाकांत बिराजदार यांनी आयुष्यमान कार्ड बनविण्याची प्रक्रिया व त्यांचे फायदे या बाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिवक्ता श्री.मारोती पंढरे यांनी सदरील योजना ही जनसामान्या पर्यंत पोहोचविण्यासाठी कर्मचाऱ्यांना आव्हान केले .
यावेळी उपस्थित सर्वांनी अवयव दानाविषयी प्रतिज्ञा घेतली.तसेच
यावेळी उपस्थित राम लोंढे आणि सचिन श्रीरंगवाड व तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.