मनुष्य हा समाजशील प्राणी आहे तो समाजात राहतो ,जीवन जगत असताना तारुण्यांमध्ये अनेक पराक्रम करतो;लहान- मोठ्या लढाया जिंकतो, शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात संशोधन करतो,आपल्या पेशानुसार यश मिळवतो,पहिलवानकी करतो,समाज सुधारणा,समाजसेवा करतो,आणि चांगल्या पद्धतीचे जीवन जगतो.
भरमसाठ पैसा कमवतो, मान-मरताब वाड- वडिलांची शेती यांच्यावर रुबाब गाजवतो, स्वतःही कमावतो आणि एके दिवशी फार मोठा धनी,पाटील,
वतनदार,जहागीरदार म्हणून नावा रूपाला येतो ,राजे,महाराजे सरदार अशी त्याची पंचक्रोशीत इज्जत होते, वर्षानुवर्ष निघून जातात. नोकर -चाकर गाड्या -घोड्या या सगळ्याचा भरपूर पसारा करून जीवन जगतो.
हेच जीवन जगत असताना त्यांना कोणाचीही गरज लागत नाही, परंतु काही काळानंतर सोयऱ्या -धा-यांना जुमानत नाही, बँक बॅलन्स भरपूर पडून असल्यामुळे कोणाच्या पुढे त्याला हात पसरायची गरज लागत नाही, निमशासकीय संस्था काढणे
,त्याचा वापर करणे, अनेक कर्मचाऱ्यां कडून देणग्याच्या नावाखाली पैसे काढून घेणे,मनाला वाटेल ते करणे, देशात,विदेशात विमानाने फिरणे या सगळ्या गोष्टी तारुण्यात केल्या जातात.
आपण या पृथ्वीतलावर फार मोठे व्यक्ती आहोत असे त्याला वाटते,आपण खोऱ्याने पैसा ओढतो; आपल्याला कोणाची आवश्यकता नाही असा भ्रम निर्माण होतो, मनुष्य हा लालची प्राणी आहे. माणसाला बरेच हव्यास असतात, शंभर एकर शेती असली तरी माणसाचं मन भरत नाही .आणखी याच्यापेक्षा जास्त असावी असे त्यांना वाटते,
परंतु जो जिता वही सिकंदर , सिकंदर जग जिंकत जिंकत आपल्या मायदेशा पासून बराच दूर गेला; नंतर त्याला त्याच्या कुटुंबाची आठवण झाली म्हणून अनेक सैनिक लढाई न करता माघारी फिरले; वाटेतच बॅबीलोन येते जग जिंकणाऱ्या सिकंदरचा दुर्दैवी मृत्यू झाला .
जे तारुण्यात मिळवलं ते वार्धक्यात गमावलं असे आपल्याला सांगता येते. सज्जनहो, कितीतरी उदाहरण आहेत की तारुण्य कसं नटलेलं होतं परंतु पुढे वार्धक्यात जवळ कोणीच राहिले नाही, असे आपल्याला काही उदाहरणे पाहता येतात,चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेते म्हणून काम करणारे रवींद्र महाजनी हे तारुण्यात खेळ कोणाला दैवाचा कळला असं गीत गाणारे स्वत:च्या जीवनाचा वार्धक्यात खेळ झाला हे त्यांना कळला नाही,
त्यांचा मृत्यू देह तीन दिवस सडून गेला होता. दुर्गंधी सुटली काय हे दुर्दैव? एकेकाळी गाजलेले अभिनेते तारुण्य संपल्यानंतर काय दुरावस्था झाली हे मानवाला कळावे, एकेकाळी विजय मल्ल्यांची विमान कंपनी होती ,काही दिवसांपूर्वी काय अवस्था झाली, हे तर सर्व जगाला माहितीआहे,असे उदाहरण आहेत ,नटसम्राट म्हणतात *घर देता का? घर* अशी अवस्था शेवटी काही लोकांची झाली .
अनेक क्रांतिकारकांना वार्धक्यामध्ये रस्त्यावर येण्याची वेळ सुद्धा आली, जग हे दिल्या घेतल्याचे असतात.तुमच्याजवळ जोपर्यंत जे काही आहे तो पर्यंत लोक थांबतात. गुळ असे पर्यंत माशी तुमच्या भोवती फिरते, गुळ संपला की कोणी जवळ येत नाही,अनेक ललना, लावणी सम्राज्ञी यांचे सुद्धा वार्धक्यामध्ये बेहाल होताना आपण पाहत आहोत, गृहकलामुळे सुद्धा अनेक चांगल्या चांगल्या लोकांची हाल झालेले आहेत,
सध्या तर अनेक आई-वडील आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवत आहेत परंतु हे परदेशात गेलेले मुले -मुली आई वडिलांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा येत नाहीत,जे काही लोकांनी त्यांच्यावर अत्यंसंस्कार केले आहेत, त्यांना सुद्धा ते व्यवस्थित बोलत नाहीत,असे अनेक उदाहरण आपण दररोज वर्तमानपत्रातून ,टीव्हीवरून मोबाईल वरून पाहत आहोत ही लाच्छांनास्पद बाब आहे.
आपली वागणूक ही एवढी खालच्या दर्जाला जाणार नाही असे वाटत होते.परंतु तिने आता पातळी सोडली आहे.
सर्वच वाईट आहेत असे मला म्हणायचं नाही, हुकूमशहा अडॉल्फ हिटलर यांनी लाखो ज्यू लोकांना यमसदनी पाठवले,परंतु नंतर त्यांना स्वत:आत्महत्या करावी लागली, मातृभक्त सानेगुरुजीनी उत्तम प्रकारचे लोकसाहित्य लिहिले, देशासाठी तुंरूग वास भोगले,परंतु शेवटी त्यांना काही गोष्टी पटल्या नाहीत, म्हणून त्यांनी आत्महत्या केली,फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळामध्ये सोळाव्या लुईने फ्रान्स मधील लोकांवर अनन्वित अत्याचार केल्यामुळे त्यांचा व पत्नीचा गिलोटिनच्या यंत्रावर शिरच्छेद करावा लागला,
हर्षद मेहता, लादेन यासारख्या लोकांनी सुरुवातीच्या काळामध्ये जिकडे तिकडे आपला रुबाब निर्माण केला होता,परंतु नंतर वार्धक्यामध्ये वाईट अवस्था निर्माण झाली चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार कादरखान, ओमपुरी यांचे हाल झाले, अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची उतारवयात किडनी खराब झाली आणि मरण पावले,नेल्सन मंडेला यांना सुध्दा वार्धक्यामध्ये तुरूंगात जावे लागले .
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या निधनाविषयी आजही उलट- सुलट बोलले जाते, मेरी क्युरीने रेडियम मूलद्रव्याचा शोध लावला त्यांना दोन वेळेस नोबेल पारितोषिक मिळाले परंतु उतारवयात कॅन्सर झाल्यामुळे ती मरण पावली, अवकाश कन्या कल्पना चावला याना तून पृथ्वीतलावर उतरणार,पण काळाने त्यांच्यावर झडप घातली, तसेच काही साधुसंतांना सुद्धा समाजाने छळले, सुरुवातीचा काळ अतिशय चांगला गेला .
परंतु वार्धक्यात त्यांना खूप यातना सहन कराव्या लागल्या, सर्वांनी आपले जीवन आनंदाने जगावे,स्वत:चे विचार इतरा बरोबर मिळते जुळते करून घ्यावे, नेहमी सत्य बोलावे,
व्यसनाधीनता करू नये, इतरांनी प्रेरणा घ्यावी,असे कार्य करावे.हीच अपेक्षा .
शब्दांकन
*प्रा, बरसमवाड विठ्ठल गणपतराव* संस्थापक अध्यक्ष:
विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी.
ता, मुखेड जि.नांदेड