लव्हेकर कुटूंबियांचा आधारवड – नाना

निस्वार्थी व निगर्वी प्रेम देणारे देविदासराव लव्हेकर उर्फ नाना यांचा 85 वा वाढदिवस त्या निमित्ताने युगसाक्षी परिवाराच्या वतीने खुप खुप शुभेच्छा…! त्यांचा मुलगा ओंकार लव्हेकर यांनी लिहलेला लेख

आज आमचे वडील आदरणीय, देविदासराव लव्हेकर  उर्फ नाना यांचा 85 वा वाढदिवस हा त्यांचा जीवनातील दुसरा वाढदिवस साजरा करीत आहोत. ‘साधी राहणी उच्च विचार’ या तत्त्वावर निरपेक्ष जीवन काटणारे नाना !नाना  म्हटले की एक प्रसन्न चेहरा, एकदम शांत, संयमी, सतत हसतमुख चेहरा पण पैशाची बिलकुल अमिश नसणार व्यक्तिमत्व म्हणजे आमचे नाना आहेत.

     स्वच्छ चारित्र्य, सर्व कुटुंबाला त्यांचा एकदम आधार आहे. नाना म्हणजे एक आनंद महोत्सव. विनोदी असणारे, थांबून थांबून एकदम एकच शब्द बोलणारे पण त्यानंतर मात्र हास्याचा कल्लोळ उठणारच याची शंभर टक्के शाश्वती!

     आज वडिलांचे वय 85 जरी झाले तरी आज त्यांची मुले, सुना ,नातू , पंतू लेक , आमचे भाचे ,भाऊजी, मावसभाऊ नानांना जीवापाड प्रेम करतात. आज आम्ही सगळेजण भाऊ 50 च्या पुढे जरी असले तरी आम्ही मात्र वडिलांच्या गळ्यात हात घालून जेव्हा बोलतो तेव्हा वडिलांचा चेहरा हा आनंदाने  डबडबून जातो. अन् नाना एकच शब्द बोलतात.

हीच माझी कमाई आहे. माझ्या सुना नसून ह्या लेकी आहेत. त्यामुळे जीवापाड प्रेम करणाऱ्या सुना ,भाऊ यामुळे नानांची तब्येत एकदम ठणठणीत आहे. अजूनही त्यांचा एकही दात पडला नाही. कधीच त्यांचे हातपाय ओढत आहेत असे कधीच म्हणत नाहीत, बिन चष्म्याचे ते वाचन करतात.

निस्वार्थी निगर्वी प्रेम देणारे प्रेम घेणारे आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देणारे असे नाना जन्मोजन्मी आम्हालाच भेटत राहोत. व नानांना अजूनही दीर्घ आयुष्य लाभो.! हीच ईश्वरचरणी हात जोडून प्रार्थना!

     नाना आई तर आमच्या आयुष्यात नाही पण तुम्ही मात्र आमच्या सोबत आहात व आपण सतत आशीर्वाद देत आहात .यातच आमचं सर्वस्व आहे.

      आज आपली तिन्ही मुलं निस्वार्थी पणाने एकमेकांना मदत करतोत संकटकाळी धावून येतोत. यापेक्षा आपण आयुष्यात काय कमाई करणार आहात! निस्वार्थी ,निर्व्यसनी व चारित्र्यवान असणाऱ्या आपल्या घराला माता जगदंबेचा आशीर्वाद आहे .याशिवाय हे शक्य नाही.

Happy Birthday,NANA

          तुमचा मुलगा ओंकार लव्हेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *