आत्महत्या करायला निघालो होतो आणि सोनल मॅडमची यूट्यूबवर मुलाखत ऐकली मग त्यांना फॉलो केले त्यांच्याशी फोनवर बोललो तेव्हा मी पूर्णपण कोलमडलो होतो कारण होते माझ्या बायकोचे बाहेर असलेले संबंध.
मॅडम ना म्हटले मला यातुन बाहेर काढा नाहीतर मी स्वतःला संपवणार त्यांनी दुसऱ्या दिवशी भेटायला बोलवले म्हणुन आज मी जीवंत आहे आणि हे सुंदर जग पाहु लागलो. त्यांनी मला इतक्या काही गोष्टी सांगितल्या की जगण्याकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोण बदलला. स्त्री पुरूष मैत्री असेल किवा कर्म विधीलिखीत आणि देव आणि त्यानुसार आपली जडणघडण आणि प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याची सकारात्मकता या देवीने मला दिली. काउंसीलींग असावे तर असे . प्रचंड देवावर श्रद्धा असलेली ही वेगळीच स्त्री आणि ओठावर सरस्वती. त्यांचा एकेक शब्द माझ्या अंगावर काटा आणत होता. त्यांनी सांगितलेला हरे कृष्ण मंत्रने माझ्या आयुष्यात वेगळाच रंग भरला. मी संदीप जाधव पेशाने शिक्षक आहे.
मॅडम मनापासून आभारी आहे तुमचा तुम्हाला देवाने कायम सुखी ठेवावे.