मुखेड :
बालासाहेब रामचंद्र पाटील बेळीकर यांचे दि. १४ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते वय ७० वर्षांचे होते.
बालासाहेब पाटील हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथून शाखाधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले होते. अत्यंत प्रामाणिक व सुस्वभावी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे ते बेरळी येथील घराच्या पाठीमागील शेतात गतप्राण झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, राजकुमार पाटील (सुजल काम्पुटरवाले), सेवादास उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्रा. संतोष पाटील हे दोन मुले, सौ. वर्षा व सौ. सुरेखा होरे दोन मुली, जावाई, सुना , नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि.१५ सप्टेंबर रोज शुक्रवारी सकाळी १० वाजता बेरळी (खु.) ता. मुखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.