कंधार ; प्रतिनिधी
भुईकोट किल्ला येथे कंधार आज २ ऑल्टोबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने साफसफाई करण्यात आली अशी माहिती प्राचार्य पाटनुरकर जी.जी.यांनी दिली.
कौश्यल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील सर्व गडकिल्ले औद्योगिक प्रशिक्षण संस्था
यांच्याकडून दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ करण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार कंधार येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आज दि. २ ऑक्टोबर रोजी भुईकोट किल्ल्याची स्वच्छतेसाठी संस्थेतील ३० प्रशिक्षणार्थी व १० कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहितीही प्राचार्य पाटनुरकर जी.जी.यांनी दिली.