( उज्वला गुरसुडकर )
वयाच्या ६ व्या वर्षी म्हणजेच ६ आक्टोबर १९८६ रोज सोमवारी घटस्थापनेच्या दिवशीच आईचे छत्र गमावलेल्या आणि अगदी लहानपणापासूनच अनेक संकटांचा सामना करत संघर्षमय जीवनाची वाटचाल करतांना पत्रकार धोंडीबा उर्फ बंडू बोरगावे यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातुन लिखाण करत आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत अनेकांना न्याय मिळवून देत जनमाणसात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली व सबंध वाचकांच्या प्रेरणा मिळवत अखंड सकारात्मक सेवा देणारे पत्रकार म्हणून नावलौकिक मिळवला त्याच संघर्ष योद्धा चा आज २ ऑक्टोबर हा जन्मदिवस.
पत्रकारिते सोबतच गेली काही वर्षांपासून जनसेवेसाठी ते राजमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यामाध्यमातून जनहितार्थ कामे करत ग्रामीण भागात अनेक सामाजिक चळवळीतून आपली वेगळी ओळख निर्माण केली व ते एक र्निभिड पत्रकार म्हणून परिचीत आहेत .