महिलांनी तहसीलदारांना घेराव घालताच, वादग्रस्त शॉपिंग सेंटरला ठोकले शील!

(कंधार : विश्वाबर बसवंते )

कंधार- शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत मंजूर असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून, रस्ता हा नियमानुसार १०० फुटाचाच करण्यात यावा, या सर्वसामान्यांच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मामा गायकवाड हे २७ सप्टेंबर २०२३ पासून कंधार येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत, त्यांच्या आमरण उपोषणास तब्बल १० दिवस होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग,महसूल विभाग, नगरपालिका प्रशासनाने आज पर्यंत केवळ बघ्याची भूमिका घेतली,

 

असल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांनाच घेराव घालून, संबंधित प्रकरणाविषयी प्रश्नांचा भडीमार करून कोंडीस धरले असता, तात्काळ तहसीलदार महोदयांनी वादग्रस्त शॉपिंग सेंटरला शील ठोकले, न्यायप्रविष्ट असलेले प्रकरण हे निर्णय होईपर्यंत सदरचे शील काढले जाणार नाही, असा विश्वास उपस्थित महिलांना व उपोषण कर्त्याना दिल्यामुळे तूर्त उपोषण मागे घेण्यात आले आहे.
सदरच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी ३ ऑक्टोबर २०२३ रोज मंगळवारी सकल मातंग समाजाच्या वतीने हजारोंच्या संख्येने आक्रोश मोर्चा काढूनही प्रशासनास कुठलाच फरक पडला नसल्यामुळे संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या महिलांनी थेट तहसीलदार राम बोरगावकर यांनाच घेराव घालून, संबंधित प्रकरणाविषयी प्रश्नाचा भडिमार केला, व महिलांनी आपला मोर्चा तहसीलकडे वळवून तहसीलदार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत, तोपर्यंत तहसीलदार महोदयांच्या दालनातून उठणार नाही, अशी भूमिका घेऊन तहसीलदारांच्या दालनातच ठिय्या मांडला होता.

सामाजिक कार्यकर्ते मामा गायकवाड यांच्या अमरण उपोषणास तब्बल १० दिवस झाले, तरी त्यांच्या उपोषणाकडे प्रशासन ढूंकुन न पाहण्याचे चित्र स्पष्ट दिसत असल्याने संतप्त झालेल्या मातंग महिलांचा विचार करून,तहसीलदार महोदय यांनी उपोषणावर तोडगा काढत न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाचा जोपर्यंत निकाल येणार नाही, तोपर्यंत वादग्रस्त शाॅपींग सेन्टर बंद ठेवण्याचे लेखी आश्वासन दिले.

त्यामुळे मामा गायकवाड यांचे अमरण उपोषण हे १० व्या दिवशी तुर्त मागे घेण्यात आले आहे. यावेळी सुभद्राबाई गायकवाड,कविता शिरसीकर, चऊत्राबाई वाघमारे, सरिता सुर्यवंशी,पप्पीताई मोरताटे,
राणीताई सिरशिकर,धुरपताबाई कांबळे, छाया सुर्वंवंश, तेजस्विनी गायकवाड यांच्यासह शेकडो महिला व पुरुष यांनी आपला सहभाग नोंदविला असल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *