कंधार ; प्रतिनिधी
शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत रस्त्यावरील अतिक्रमण काढून शंभर फुटाचा रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी मामा गायकवाड यांनी गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषणाचा केले होते.आज उपोषणाचा दहावा दिवस होता परंतु गेंड्याची कातडी ओढलेले नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्या जात होते.या उपोषणाला पाठींबा म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर साखळी पोषण करण्यात येत आहे.तर या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ ३ आॅक्टोबर रोजी समस्त मातंग समाजाच्या आक्रोश मोर्चा काढण्यात आला असतानाही प्रशासनाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही.मातंग समाजाच्या महिलांनी तहसीलदार राम बोरगावकर यांना घेराव घातला व प्रश्नाचा भडिमार केला व महिलांनी मोर्चा तहसीलकडे वळवून तहसीलदारांचा निर्णय येई पर्यंत तहसीलदारांच्या दालनात ठिय्या माडून बसल्या होत्या.
कंधार शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे.२०२१ साली आयचरच्या अपघातामध्ये पती-पत्नीला जीव गमवावा लागला तर महाराणा प्रताप चौकात ट्रॅव्हलस घुसली होती.शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते जाधव हॉस्पिटल या दरम्यानच्या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे.सदर रस्त्याची निविदाही निघाली.परंतू सदर रस्ता कमी करण्याचा नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्न करत होते.परंतू ही बाब शहराच्या विकासाच्या दृष्टीने हितकारक नसल्याने माजी सैनिक संघटना व मातंग समाजाच्या वतीने विरोध करीत आंदोलने,रास्तारोको करण्यात आले.यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग कंधारने रस्ता शंभर फुटाचा करण्याचे लेखी आश्वासन दिले.परंतू त्यावर कसलीही कारवाई होत नसल्याने मामा गायकवाड यांनी दि.२७ सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले.तर या उपोषणाला पाठींबा म्हणून दि.२८ सप्टेंबर पासून साखळी उपोषणास सुरुवात केली.तर समस्त मातंग समाजाच्या वतीने भव्य असा आक्रोश मोर्चा दि. ३ रोजी काढण्यात आला होता. याबाबत असलेली प्रशासनाची दुय्यम भूमिका स्पष्ट दिसत आहे. आज मामा गायकवाड यांच्या आमरण उपोषणास दहा दिवस झाले तरी त्यांच्या कडे ढूंकुन न पाहण्याचे चित्र स्पष्ट दिसत असल्याने भडकलेल्या महिलांनी चक्क तहसीलदार यांना घेराव घालून तहसील कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले यावर
तहसीलदार यांनी उपोषणावर तोडगा काढत न्यायप्रविष्ट असलेल्या ह्या प्रकरणी निकाल येणार नाही तोपर्यंत वादग्रस्त शाॅपींग सेन्टर बंद ठेवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मामा गायकवाड यांचे दहाव्या दिवशी तुर्त मागे घेण्यात आले आहे. यावेळी सुभद्राबाई गायकवाड,कविता शिरसीकर,चऊत्राबाई वाघमारे, सरिता सुर्यवंशी,पप्पीताई मोरताटे, राणीताई सिरशिकर,धुरपताबाई कांबळे, छाया सुर्वंवंशी, तेजस्विनी गायकवाड यांच्या सह शेकडो महिलांनी सहभाग नोंदविला असुन विशेष म्हणजे त्यांनी न्याय मिळे पर्यंत तहसीलदार कार्यालयात ठिय्या मांडला आहे.
या आमरण उपोषणाला आमदार शामसुंदर शिंदे यांनी भेट देवून दोन दिवसांत अतिक्रमण पाडून शंभर फुटाचा रस्ता करण्याचे आश्वासन दिले.परंतू त्यावरही हालचाल झाली नाही.तहसीलदार तथा मुख्याधिकारी राम बोरगावकर यांनी आदोंलनकर्त्याना लेखी देऊनही कुठलीच कारवाई केली गेली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुमीत पाटील हे कागदी मेळात गुंतुन पडले आहेत.या आदोंलनास कंधारच्या विकासासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय नेत्यांनी पाठींबा दिला आहे.याबाबत तालुक्यातील नागरिकांनी कंधारच्या विकासासाठी स्वाक्षरी मोहीम सुध्दा राबविली आहे.प्रशासनाने या आदोंलनाची चांगलीच धास्ती घेतली आहे.प्रशासनाच्या वतीने आदोंलनकर्त्याना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न होतांना दिसत आहेत.