कंधार ; प्रतिनिधी
१०० फुटाचा रस्ता कंधार शहरातून व्हावा तसेच अतिक्रमण हटवून साहीत्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मागे असणारा पुतळा दर्शनी भागात यावा यासाठी संकल मातंग समाज कंधारच्या वतीने कंधार शहरातील बांधकाम विभागाच्या कार्यालया समोर मारोती मामा गायकवाड यांचे अमरण उपोषण गेल्या १० दिवसापासून चालू आहे ,
यावेळी उपोषण कर्ते मामा गायकवाड यांच्या समर्थनासाठी मातंग समातील महीला आता सक्रीय झाल्या असून कंधारचे तहसिलदार राम बोरगावकर यांना जाब विचारण्यासाठी आज दि ६ ऑगस्ट रोजी महिलांनी गराडा घातला .
मातंग समाजातील सकल मातंग समाजाच्या वतीने मामा गायकवाड यांना न्याय मिळावा म्हणून पुतळा परिसरात साखळी उपोषण सुरू आहे तर नुकताच आक्रोश मोर्चा काढण्यात आला .
दरम्यान र्या उपोषणाला सवेच स्थरातून प्रतिसाद मिळत असून लोकप्रतिनिधी व राजकीय मंडळी केवळ फायदा मिळवण्यासाठी सदर प्रकरणी चाल ढकलून वेळ काढत आहेत
आज दि .६ ऑक्टोबर रोजी उपोषणाचा १० वा दिवस आहे .
वेळोवेळी मामा गायकवाड यांची प्रकृती खालावत चालली आहे . त्यामुळे चिंतीत महिलांनी तहसिलदार राम बोरगावकर यांना भेटण्यास भाग पाडले . तात्काळ प्रश्न मार्गी लावावा अन्यथा महीला व पुरूष तरुण मंडळी रस्त्यावर उतरेल अशा ईशारा महिलांनी दिला .