प्रतिनिधी,
(कैलास शेटवाड)
कंधार:-पेठवडज येथील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलन मा.श्री.मनोज जरांगे पा.यांनी उपोषणाला पाठीमागे घेतल्यानंतर दिनांक 7.9.2023 रोजी पासून पेठवडज ग्रा.पं.का.येथे उपोषणाला सुरुवात करण्यात आलेले असता त्यानंतर श्री.मनोज जरांगे पा.यांनी उपोषणाला मागे घेतल्यानंतर पेठवडज येथे दि.14.9. 2023 पासून साखळी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर आज दि.06.10. 2023 रोजी पेठवडज या ठिकाणी कळका येथील उपोषण कर्ते यांनी आज साखळी उपोषणाच्या 23 व्या दिवशी दि.6.10.2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज ठिकाणी साखळी उपोषण कडकडीत करण्यात आलेले आहे. तरी यावेळी उपोषण कर्ते मा.श्री. गोविंद संग्राम पाटील गायकवाड (ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी तथा काँग्रेस सर्कल प्रमुख पेठवडज) व तसेच मा.श्री.देविदास पा.बालाजी गायकवाड व तसेच श्री.प्रकाश रावजी जेजेराव गायकवाड व श्री. सचिन गोविंदराव गायकवाड व श्री.व्दारकेश नागोराव गायकवाड व व तसेच मा.श्री.व्यंकटरावजी जाधव साहेब (भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य व तसेच पत्रकार परिषद संघटना मराठवाडा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते) व सर्व कळका येथील सर्व समाज बांधव व पेठवडज येथील सर्व नागरिक व सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते व तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभलेले आहे