(कौठा प्रतिनिधी : प्रभाकर पांडे )
कवठा तालुका कंधार येथील अमरपदवासी द.भ.प. दिगंबरराव गोविंदराव देशमुख गुरुजी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त सोमवार दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी१० ते १२ वाजेपर्यंत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन श्री दत्त मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोहा कंधार विधानसभाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कंधार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बालाजीराव पांडागंळे युवा नेते विक्रांत शिंदे यांच्या उपस्थितीत तज्ञ डॉ.मयुरेश रामपुरकर(मेंदू व मनका विकार तज्ञ) डॉ .शंभुप्रसाद केंद्रे (अस्थिरोग तज्ञ) डॉ.विजय व डॉ.सौ.कल्याणी यन्नावार (दंत व मुख रोग तज्ञ) डॉ.विजय मोरे व डॉ.सौ.जयश्री बोडके (स्त्रीरोगतज्ज्ञ ) डॉ.स्वप्नजा चांडोळकर (जनरल फिजिसियन) लाॅयण्स रुग्णालयातील नेत्ररोग तज्ञ डॉक्टर हे मोफत तपासणी करणार आहेत. दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२श्री श्री १००८यदुबन महाराज दत्त संस्थान कोलंबी यांच्या प्रमुख उपस्थितीत द.भ.प. मैनाताई हिप्परनाळीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
संध्याकाळी ठीक नऊ वाजता दत्त भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या शिबिराचा १५०० रुग्णांनी लाभ घेतला व 22 रुग्णांचे डोळ्याचे ऑपरेशनसाठी लायन्स नेत्रालय येथे लाभ देण्यात आला सदरील कार्यक्रमाचे नियोजन बालाजीराव देशमुख बसवंतराव देशमुख अविनाश देशमुख सतिश देशमुख सह संपूर्ण गावातील युवक व लहान थोर यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला तसेच आभार आयोजक प्रताप देशमुख यांनी मानले