धर्मापुरी : येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयाच्या २०१० च्या बँचचे विद्यार्थी शिवाजी व्यं गित्ते हे नुकतेच ओमान आणि कुवेत देशातून परत आले आहेत. ते रामवाडीचे रहिवासी आहेत. त्यांनी एम काँम , एम बी ए शिक्षण घेतले आहे. ते वेअर हाऊस अस़ोसिएट पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आज दि १० आँक्टो २३ रोजी महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ कोकणे जे पी यांनी शाल आणि ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.छायाचित्र : प्रा भगवान आमलापुरे