एसटी ड्रायव्हरला शिवीगाळ करून गाडीच्या खाली ओढून मारहाण.

 

कंधार : प्रतिनिधी

कंधार आगाराची कंधार जळकोट कंधार पानशेवडी मार्ग बस क्रमांक एम एच ४० एक्यू ६३४८ ही बस कंधार आगारातून सकाळी सव्वानऊ वाजता निघुन जळकोट येथे प्रवाशी सोडून व परत प्रवाशी घेवुन जळकोट ते कंधार पानशेवडी मार्ग येण्यासाठी ११ वाजता जळकोट येथुन निघुन प्रवाशी घेत सोडत येत असतांना हाडोळी (ब्र) ता. कंधार शिवारात शेतामधुन एका व्यक्तीने हात दाखवला तेव्हा तेथे बस स्टॉप नसल्याने बस उभे न केल्याने अंदाजे १२ च्या सुमारास सोमठाना बस स्टॉपवर बस उभी करून प्रवाशी सोडत व घेत असतांना पाठीमागुन मोटार सायकलवर दोघे येवुन मागे बस समोर रोडवर मोटार सायकल थांबवुन तु हाडोळी शिवारात हात दाखवला असता तु बस का थांबवली नाहीस शिवीगाळ करून ड्रायव्हर मारहाण केली.

कंधार आगाराची कंधार जळकोट कंधार पानशेवडी मार्ग बस सोमठाणा ता. कंधार बस स्टॉपवर प्रवाशी सोडत व घेत असतांना शिवशंकर बाबुराव केंद्रे व बाबुराव शंकर केंद्रे रा. हाडोळी ता. कंधार यांनी पाठीमागुन मोटार सायकल घेवुन समोर येवुन बस समोर थांबवुन तु बस का थांबवला नाहीस म्हणुन ड्रायव्हर बी.एस. मुंडे यांना अश्लिल शिवीगाळ करून बसचे दार काढून बाहेर ओढून नालीमध्ये टाकुन लाथाबुक्याने मारहाण करून हातातील लोखंडी कडयाने डोक्यात मारून दुखापत करून खतम करण्याची धमकी दिली. ड्रायव्हरने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध ३१४, १२३, ३५३,३३२,३२४,२९४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मुखेडकर हे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *