( कंधार ; प्रतिनिधी )
एस टी महामंडळाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान हाती घेतले आहे या अभियानाची कालावधी मे 2023 ते एप्रिल 2024 एक वर्षाची असून या अभियानात राज्यातील 580 पेक्षा अधिक बस स्थानके सहभागी झाले आहेत यामध्ये कंधार व लोहा बस स्थानकाचा समावेश आहे यामुळे कंधार येथील बस स्थानक स्वच्छतागृह बस स्थानक परिसर प्रवासी बस आधी स्वच्छ व टीप टॉप बनले आहेत या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत यवतमाळ विभागाच्या पथकाकडून बस स्थानकाची पाहणी करण्यात आली यावेळी पथकाकडून स्वच्छते बद्दल व रंग-रुंगोटी बद्दल कौतुक केले आहे
राज्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस स्थानके स्वच्छ सुंदर व पर्यावरण पूरक करण्यासाठी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात येत आहे या अभियानात बस स्थानकाची विविध बाबीची आधारावर मूल्यांकन करून त्यांना पुरस्कार दिले जाणार आहे यावेळी बस स्थानक परिसरातील स्वच्छता पाहून यवतमाळ येथील पथकाकडून कंधार व लोहा बस स्थानक स्वच्छते बद्दल व रंग-रोंगोटी बद्दल येथील आगार प्रमुख अभय वाढवे व त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले आहे या पथकात यवतमाळ विभागाचे विभाग नियंत्रण अमोल गोंजारी विभागीय अधिकारी सतीश पलेरिया विभागीय संख्या की अधिकारी संदीप कोडापे यांच्यासह नांदेड विभागातील वाहतूक व बांधकाम विभाग कर्मचारी उपस्थित होते
* कंधारचा किल्ला व चंद्रयान बनले सेल्फी पॉईंट
कंधार आगारातील कर्मचारी व आगारप्रमुख यांच्या संयुक्त कामगिरीतून कंधार बस स्थानक टीप टॉप बनवून रंगरंगोटीने चकाचक केले आहे यामध्ये बस स्थानकात चंद्रयान कंधारचा किल्ला या सह गार्डन तयार करून येथे नागरिकासाठी प्रवासासाठी कर्मचारी व तेथील लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने असन व्यवस्था विश्राम करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे .
* विविध पथकाकडून बस स्थानकाचे मूल्यांकन
या अंतर्गत इतर जिल्ह्यातील विभागातील पथकाकडून बस स्थानकाचे मूल्यांकन करण्यात येत आहे यवतमाळ विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत कंधार व लोहा बस स्थानकाचे मूल्यांकन करून परिसराची पाहणी करण्यात आली या मूल्यांकनांतर्गत चार टप्प्यात बस स्थानकांच्या स्वच्छतेची तपासणी करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात कंधार बस स्थानकाची कामगिरी समाधानाकारखाली आहे तर दुसऱ्या टप्प्यात तपासणी कौतुक करण्यात आले आहे .