(कंधार |धोंडीबा मुंडे )
कंधार तालुक्यातील सोयाबीनवर पिकावर ‘यलो मोझॅकमुळे’ शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न झाले पिवळे रोगाच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे सोयाबीन पीक संकटात सापडले आहे.सोयाबीन पीक कापणीसाठी एक महिना असताना या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.या रोगामुळे उत्पन्नात ५० टक्क्यापेक्षा अधिक घट होणार आहे.असे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे,
एक महिना पावसाच्या खंडामुळे आणि आत्ता यलो मोझॅक रोगामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. येणाऱ्या काळात आर्थिक तजवीज करून रब्बी हंगामाची कशी-बशी तयारी करायची, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.येणारी दिवाळी देखील शेतकऱ्यांसाठी कडू ठरण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. पीकविमा कंपनीची अग्रिम रक्कम अजून शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली नाही.
त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत करावी,अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सोयाबीन पीक फुलोरा, तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना या पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आला,ऐन शेंगा भरण्याच्या काळात सोयाबीन पिकावर ‘यलो मोझॅक’ रोगाचे संक्रमण आल्याने शेतातील सोयाबीन पिके शेंगांची भरण्या अगोदरच पिवळे पडत असून,यामुळे सोयाबीन पिकाला अत्यंत कमी प्रमाणात तसेच चपट्टी शेंगाची लागण झाल्याचे चित्र दिसत आहे.
त्यामुळे कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न ‘यलो मोझॅक’ नावाच्या सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे पिवळे पडले असून, शेतकऱ्यांना तात्काळ राज्य शासनाकडून अर्थिक मदत जाहीर होणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांतुन बोलले जात आहे.
कंधार तालुक्यामध्ये यावर्षी सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिलाने तालुक्यातील सोयाबीन
कपाशी व तुर पिके चांगल्या प्रमाणात पिकाच्या पेरा या वर्षी वाढला असून,गेल्यावर्षी संतत-धार पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले . संततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिके काढता सुद्धा आली नाही. यंदा सोयाबीन पिकावर ‘यलो मोझॅक’ या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर आल्याने शेतामधील सोयाबीनचे पिके शेंगा भरण्या अगोदरच पिवळे पडत आहेत.
यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकापासून मोठी अपेक्षा केली असून हिरवे स्वप्न रंगवले होते. परंतु सोयाबीन शेंगा भरण्या अगोदरच ‘यलो मोझॅक’ नावाच्या रोगाने शेतातील उभे सोयाबीन पिवळे पडायला लागली, सुरुवातीच्या पावसानंतर गेल्या दोन महिन्यांपासून सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने पिकांना पाहिजे तशी झडती मिळणार नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवले जात आहे.