सॅटेलाईट डिजीटल पब्लिक स्कूल येथे स्वच्छता अभियान 

नांदेड (प्रतिनिधी )
 ऑक्टोबर महत्मा गांधी जयंती निमित्त 1 ऑक्टोबर 2023 वार रविवार रोजी ‘स्वच्छता अभियान’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सॅटेलाईट डिजिटल पब्लिक स्कूल गणेश नगर रोड येथील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला आणि आजूबाजूच्या परिसराची कचरा उचलून परिसर स्वच्छ केला त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील लोकांनी कौतुकाची थाप दिली.

आपल्या चिमुकल्यांच्या हाताने श्रमदान किंवा स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन या उपक्रमास हातभार लावून आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ कसा ठेवला पाहिजे याची जाणीव करून दिली. स्वच्छता ही काळाची गरज ठरली आहे. असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक श्री. नितीन सोनकांबळे यांनी केले आहे. या उपक्रमात सुनिता गायकवाड, सुचिता इंगोले आणि मायाबाई यांचा ही सहभाग होता. रूचिरा बेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला होता.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *