@आठवाना ऊब देणारा तिचा एक फोन ; कथा

 

सायंकाळच्या वेळी निवांतपणे जुन्या आठवणीत रमत असतानाच अचानकपणे एक फोन आला.नंबर ओळखीचा नव्हता पण त्या फोन पलिकडून येणारा आवाज मात्र ओळखीचा होता…एक मोठा उच्श्वास घेऊन मी “हाँलो… कोण बोलतयं”…असं विचारले…”हाँलो मी’ बोलत आहे.ओळखलंस ना मला” असा आवाज ऐकताच मंद गारव्याच्या लहरी अंगाला झोंबू लागले…अन् अंगभर आठवाचे शहारे उभारले… पुन्हा तोच आवाज कानी आला…”हाँलो मी बोलतेय ओळखलस ना मला”…मी चाचपळलो आणि “हो हो म्हणत पटकन सावरलो”…कारण खूप वर्षानंतर तिचा आवाज ऐकला होता…जुन्या आठवणी बोलत बोलत…डोळ्यासमोर चलचित्राप्रमाणे पळू लागले होते…
मी विचारलं “कशी आहेस तु” ,”ती म्हणाली छान आहे”… हे ऐकून मनाला थोडा तडा गेला.कारण, माझ्याशिवाय तिला छान राहण जमतयं हे बोचणार होतं…ह्या एका विचाराण …आणि मी हि तिन न विचारता सांगून दिले की, “मी पण खूप मजेत आहे” असं… ती ही खेदात्मकच हसली असावी अस जाणवलं…
“आज माझी आठवण कशी काय आली”…हे तिला मी विचारलं… या प्रश्नांच उत्तर टाळून ती …दुसरं ,तिसरंच बोलत राहिली …मीही सारकाही जाणून …फक्त ऐकतच राहिलो… मग आमचा हा संवाद. .. मधुर आठवणीच्या शब्दांच्या जुगलबंदीत कधी रूपांतरित झाली हे कळलेच नाही.
किमान एक – दिड तास आम्ही जुन्या आठवणींना
उजाळा देत बोलत राहिलो… ना वेळेचे भान होते,ना जागेचे भान होते…दोन स्वछंदी पक्षी आकाशात विहंग करत होते…शेवटी फोन ठेवण्याची वेळ आली होती…तरी फोन कट करावासा वाटतच नव्हता… फोन कट केला तर काळजाचा ठोका चुकेल की काय असं वाटत होते… पण नाही म्हणता म्हणता फोन कट केला गेला…आणि डोळ्यातून अजाण पण एक ओल पाझरली…
फोन ठेवला गेला होता,बोलण बंद झाले होते. तरी पण..माझ्या कानावर तिचे शब्द अजून ही रेंगाळत होते…तिच्या आवाजाचा निनाद आसपास घुमत होता…ती सांयकाळ माझ्यासाठी आठवाना उजाळा देण्यारी छटांची उधळण करणारी होती…पुढे सरकणारा एक एक क्षण हा…तिच्याच सहवासात असल्यासारखे
जात होते…
हिच सांयकाळ आता तिच्या माझ्या आठवणीत रमत… रात्रीत रूपांतरित झाली होती…ना भुक होती ,ना तहान होती…तिची आभासी प्रतिमा घेऊन अंथरूणात आळसल्यागत घालावी वाटत होती…पापण्यांची पातनांवर तिच्या आठवांचा पसारा थैमान घालत होते…
डोळे बंद केली की ती जवळ असायची आणि उघडले की तीच्या आठवणी समोर आसायच्या… ऐवढा कसा मी तिच्यात गुंतलो होतो…अन् दिवसागणिक रमत गेलो होतो..तिच्तात.माझ्या मनात आठवाचे पाठे सुरुच असताना अलगल तिच्या सह झोपेने मला कवेत घेतले…
शामलरंगाची पहाटवेळ माझ्यातल्या माझ्यावर खूप भाळली होती… चादरेत राहून पक्षांची गुजांरव,वार्याचा स्पर्श, आणि उबदार थंडी माझी छेड काढत होते…हीच छेड मला हवी हवीहवीशी वाटत होती…
तिच्या अप्रत्यक्ष सहवासात रात्र कशी गेली हे कळलेच नाही… रात्रीची मंतरलेली गुलाबी थंडी हि आता पण डोळ्यासमोर तरळू लागली होती… आणि माझ्या ओठावरची लाली फुलू लागली होती…
बेधुंद आठवाची ऊब उतावळेपणे मी शहारे येईपर्यंत झेलत होतो…तेव्हाची ती सांयकाळ आजही माझ्यासाठी ऊबदार आठवाची रात म्हणून ठरत होती…
तिच्या काही क्षणाच्या बोलण्याने माझे प्रत्येक क्षण पुलकित झाले होते… पुर्वी चे असलेले रूसवे, फुगवे…आता ही आठवाची ऊब देवू लागले आहे…
अजून पर्यंत माझे मन आणि मी तिच्या फोनच्या प्रतिक्षेत सज्जच आहे…

 

 

सौ.रूचिरा बेटकर,नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *