कंधार तालुक्यातील सर्वच माध्यमांच्या शाळेत आज राज्य शैक्षणिक संपादनूक सर्वेक्षण परीक्षा ; गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांची माहिती

 

कंधार ; प्रतिनिधी

आज 3 नोव्हेबर रोजी राज्य शैक्षणिक संपादनूक सर्वेक्षण परीक्षा SEAS -2023 ( PARAKH ) मार्फत राज्यासह देशातील काही निवडक शासकीय ,शासकीय अनुदानित खाजगी शाळांमध्ये ३ री , ६ वी ,९ वी , वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच दिवशी आयोजित करण्यात आली असून कंधार तालुका शिक्षण विभाग सज्ज झाला असून संपूर्ण नियोजन योग्य केले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांनी दिली .

 

 

2 नोव्हेबर रोजी याबाबतीत गटसाधन केंद्र कंधार येथे बैठक घेण्यात आली व नियोजन करण्यात येवून जवळपास १०० समन्वयकांची उपस्थिती होती .

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांनी सखोल मार्गदर्शन केले , केंद्र प्रमुख माधव कांबळे , एन एम वाघमारे , साधनव्यक्ती मलगीरवार यांची उपस्थिती होती .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *