राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेची आढावा बैठक

नांदेड/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आ.रोहितदादा पवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येत असलेल्या संघर्ष यात्रेची तयारी सुरू असून छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच सेलच्या पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी व्यासपिठावर आ.रोहितदादा पवार, माजी आ.विजय भांबळे, माजी आ.संजय वाघचौरे, विलास गावंडे, वाशिम जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या बैठकीला नांदेड जिल्ह्यातून बाजार समितीचे संचालक भगवानराव पाटील आलेगावकर, माजी सभापती अ‍ॅड.भाऊसाहेब गोरठेकर, बुथ कमिटीचे नांदेड जिल्हाध्यक्ष गजानन पांपटवार, जिल्हा सरचिटणीस प्रा.डी.बी.जांभरूनकर, जिल्हा बुथ कमिटीचे अध्यक्ष डॉ.विक्रम देशमुख आदी जणांची उपस्थिती होती. निवडक पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या बैठकीमध्ये संघर्ष यात्रे संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *