लिंबगाव नांदेड येथील डॉ कन्हैया कदम यांना के.के.हर्बल इंडस्ट्रीज भारत बिसनेस पुरस्कार

नांदेड : नांदेडच्या लिंबगाव येथील डॉ कन्हैया कदम यांच्या प्रत्येक पेशंटला आहार, विहार, आणि विचार याची सांगड घालून त्यांनी आत्ता पर्यंत हजारो दुर्धर आजारावर मात करत अनेक रुग्णांना बरे केले आहे यामुळेच त्यांना या वर्षी ‘मोस्ट रिनोन्ड हर्बल प्रॉडक्ट ब्रँड इन इंडिया’ ने त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे .हा कार्यक्रम मुंबई येथील भारतरत्न लता मंगेशकर नाट्य गृह येथे झाला.

आयुर्वेद परंपरेच्या हजारो वर्षांच्या वारसा, शुद्धता आणि मातृस्वरूपाचा स्पर्श, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि डॉ. कन्हैया कदम यांचे संशोधन व त्यांच्या क्रॉनिक आणि गंभीर रूग्णांच्या उपचारांचा क्लिनिकल अनुभव, परिणामी के.के. हर्बल्सची उत्पादने आज नावारूपाला आली आहेत.

त्यामुळेच महाराष्ट्रासह शेजारील तेलंगणा, आंध्रा, कर्नाटक, गुजरात, पंजाब, हिमाचल, दिल्ली, पश्चिम बंगाल, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश इत्यादी राज्यासह ‘परदेशातूनही’ रूग्ण लिंबगाव (ता.जि.नांदेड) येथील ‘सर्वज्ञ आयुर्वेद चिकित्सालय आणि संशोधन केंद्रात’ येत आहेत.

त्यांनी आत्ता पर्यंत अनेक दुर्धर आजारावर मात केली असल्याचे ते सांगतात या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार मिळाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *