भाऊचा माणुसकीचा फ्रिज”मध्ये दिवाळीच्या कालावधीत एक क्विंटल पेक्षा जास्त वेगवेगळी मिठाई ठेवण्यात आल्यामुळे शेकडो गरजूंची दिवाळी गोड झाली.

नांदेद ; गेल्या तेरा महिन्यापासून नांदेड येथील महावीर चौक भागात भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून बसविण्यात आलेल्या “भाऊचा माणुसकीचा फ्रिज”मध्ये दिवाळीच्या कालावधीत एक क्विंटल पेक्षा जास्त वेगवेगळी मिठाई ठेवण्यात आल्यामुळे शेकडो गरजूंची दिवाळी गोड झाली.

भाजपा ,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल ,अमरनाथ यात्री संघाच्या वतीने खा.चिखलीकर, भाजप महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, लायन्सचे योगेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात वर्षभारत तब्बल पंचवीस हजारापेक्षा जास्त डब्याचे वितरण करण्यात आले.नांदेड शहरात कोणीही उपाशी राहू नये यासाठी हा नवीन उपक्रम पंचवटी हनुमान मंदिर येथे सुरू केला होता.या उपक्रमात एकही दिवस खंड पडलेला नाही. दररोज किमान ४० ते १२० डबे अन्नदात्यांच्या हस्ते वाटप करण्यात येतात. गेल्या वर्षी दिवाळीत आठवडाभर फ्रीज मध्ये मिठाई ठेवण्यात आली होती.

यावर्षी देखील मिठाई ठेवण्याचा मनोदय दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केल्यानंतर अनेकांनी प्रतिसाद दिला. प्रत्येकी दहा किलो मिठाई देणाऱ्यामध्ये डॉ.भगवान केंद्रे गंगाखेड ,
गणेश गोडसे मुदखेड,स्नेहलता जायसवाल हैदराबाद,सौ.वर्षा विजयकुमार धारासुरकर,सौ.अनुसया किशोर नोमुलवार, ॲड.दिलीप ठाकूर,सौ.सिमरन अक्षित गुप्ता,परमेश्वरीबाई सिंघल यांचा समावेश आहे. बुंदी लाडू,बालुशाही,बेसन लाडू ,करंजी,मैसूरपाक,जिलेबी,सोनपापडी, गुलाब जामून अशी विविध मिठाई वाटप करण्यात आली. याशिवाय अनेकांनी आपल्या घरी बनवलेली मिठाई फ्रिजमध्ये आणून ठेवली. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मिठाई घेतली. या दरम्यान अन्नदान करणाऱ्यांमध्ये कु.सेजल संजय सुर्यवंशी,हभप शिवाजी महाराज बरबडेकर,सौ. विजयालक्ष्मी बालाजी सूर्यवंशी,जेष्ठ पत्रकार डाॅ.एस.एस.जाधव, सुमन्तसिंह ठाकूर तुळजापूर,पुनम कुलकर्णी पुणे,मंदार केशव हळदेकर,नवलकिशोर गुप्ता,विनायकराव भगवानराव चौधरी ,जीवन अग्रवाल माहूर,उमा गट्टानी भाभी, सतीश सुगनचंदजी शर्मा, कॅप्टन निळकंठ केसरी,अमर खंडेराव शिखरे पाटील, निळकंठ गिते,शांताबाई गोविंद केंद्रे,सदानंद रघुवंशी नंदुरबार,सुनिता काबरा,भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवप्रसाद राठी, श्रीकांत देशपांडे,रमेश कांबळे ,श्रीकृष्ण माधवराव नांदेडकर बाळू सातोरे ,आदिती प्रणव पाडळकर, अनिल गाडे यांचा समावेश आहे.

आपल्या प्रियजनांच्या वाढदिवसा निमित्त अथवा स्मृतीप्रित्यर्थ जेवणाचे डबे अथवा इतर खाद्यपदार्थ द्यायचे असतील तर त्यांनी ९४२१८ ३९३३३ वर गुगल पे अथवा फोन पे द्वारे ₹ २००० भरून संपर्क साधावा. त्यादिवशी सकाळी १० वाजता त्या अन्नदात्यांच्या हस्ते ४० जेवणाचे डबे फ्रीजमध्ये ठेवून गरजूंना वाटप करण्यात येतात.त्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाळीस हजार लोकांपर्यंत व्हायरल केले जातात.एका दिवशी जास्तीत जास्त तीन दानशूर नागरिकांना अन्नदान करता येते.गेल्या वर्षी ज्या दिवशी अन्नदाते मिळाले नाहीत त्या दिवशी सूचना केल्यानंतर प्रसिध्द उद्योजक नवलकिशोर गुप्ता,प्रा.के.एच. दरक, बलबिरसिंह ठाकूर,चंद्रकांत गंजेवार,शांता विष्णुगोपाल काबरा,उपेंद्र मुळावेकर,साईनाथ उत्तरवार,डॉ.प्रणद जोशी, रागिणी जोशी यांच्या सह अनेकांच्या सहकार्याने या उपक्रमात एकही दिवस खंड पडलेला नाही. पंचवटी हनुमान मंदिराचे अनिलसिंह हजारी,सरदार संजीवसिंघ नील,सुधीर देबडवार यांचे नेहमी मार्गदर्शन लाभते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभुदास वाडेकर,अरुणकुमार काबरा,राजेशसिंह ठाकूर,सविता काबरा, विजय वाडेकर,सुरेश शर्मा,विलास वाडेकर, डॉ. मनीषा तिवारी,कामाजी सरोदे, सुरेश निलावार ,संतोष देशमुख यांनी परिश्रम घेतले.दुसऱ्या वर्षात आपणाला हवी असलेली तारीख सुनिश्चित करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन संयोजक ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *