संजय भोसीकर यांच्या वतीने दीपावली निमित्त स्नेहमिलनाचा कार्यक्रम संपन्न

 

कंधार दि.16 नोव्हेंबर (प्रतिनिधी)

दीपावली निमित्त माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या कंधार येतील निवासस्थानी स्नेहमिलनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी दीपप्रज्वलन करून स्नेह मिलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व उपस्थित सर्वांना संजय भोसीकर यांच्या वतीने दीपावली निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

 

यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा संदेश व्यक्त करतांना सांगीतले की भारतात सर्व धर्मीय लोक हा सण आनंदात साजरा करतात. “दिवाळी” हा रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप हा मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या व सर्व बंधुभगिनिच्या जीवनात प्रकाश निर्माण होऊन यश प्राप्ती व्हावी म्हणून हा स्नेहमिलानाचा कार्यक्रम आयोजित केला होताअसे ते म्हणाले.

यावेळी लोह्याचे माजी नगराध्यक्ष कल्याण सावरकर सुर्यवंशी कंधार चे माजी उपनगराध्यक्ष मन्नान भाई चौधरी, माजी उपनगराध्यक्ष सुधाकरराव कांबळे कंधार शहराध्यक्ष हमीद भाई सुलेमान,सेवादलाचे तालुका अध्यक्ष रमेशसिंह ठाकुर, बालाजीराव रामराव पांडागळे,राजकुमार केकाटे, MiM चे अध्यक्ष शेख हाबुभाई,माजी,सरपंच बालाजीराव गित्ते, वसंतराव पाटील घोरबांड, पोलिस पाटील भगवानराव कपाळे,व्यंकटराव चावरे,

 

दत्ता पाटील,शेख अमीर भाई,शेख दस्तगीर भाई,सय्यद सलीम,शेख पाशा भाई, शेख रब्बानी,साहेबराव देशमुख,सुरेश कल्लाळीकर,अजय मोरे,स्वप्निल परोडवाड,अजिंक्य पांडागळे,दसरथ वाघमारे,अशोक कांबळे,तारकेश तपासे,शिवम पाटील कुरुळेकर,शेख खैसर भाई राजु श्रीमंगले,इम्रान पठाण,सय्यद अहमद खाजा शेठ शखिल शेठ आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *