कंधार ;( दिगांबर वाघमारे )
आखिल भारतीय विरशैव संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांचा दि,१६ नोव्हेबर रोजी कंधार येथे शासकीय गुतेदार तथा समाजसेवक वैजनाथ सादलापुरे यांच्या कंधार येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
https://youtu.be/xg4dvBJogOw?si=rYKi2yZowpJky1SR
आपल्या अभ्यासपूर्ण सैलीतून गंभीर विषयाची हाताळणी सहजपणे करून आपल्या संघटन कौशल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक , आंध्रप्रदेश आदीसह अन्य राज्यात शिवा संघटनेचे मोठे नेटवर्क उभारून समाजाला प्रबोधन करून दिशा दाखवणारे प्रा मनोहर धोंडे सर सुअपरिचीत आहेत .
१६ रोजी कंधार येथे ठिकठिकाणी त्यांनी भेटी दिल्या त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला . येथिल शासकीय गुत्तेदार तथा समाजसेवक वैजनाथराव सादलापुरे यांनी त्यांचा निवासस्थानी सत्कार केला यावेळी .
माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड , संपादक पञकार माधव भालेराव , एसपी केंद्रे , प्रा.चिवडे , प्रा. पांडागळे , आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती .