कंधार ( प्रतिनिधी )
लोहा कंधार शहरात तसेच तालुक्यामध्ये सर्रास राजरोसपणे खुलेआम गुडगुडी व मटका चालू आहे या मटका व गुडगुडी या अवैध जुगाराच्या नादी लागून मतदारसंघातील सर्वसामान्य तरुण, शेतकरी, कष्टकरी, मजूर वर्ग बळी पडत असून तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे व तरुण, शेतकरी , कष्टकरी मजुरांचे संसार उध्वस्त होत आहेत.
लोहा कंधार मतदारसंघात खुलेआम चालू असणाऱ्या अवैध मटका व गुडगुडी सह अवैध गुटखा, अवैध दारू सह इतर अवैध धंदे तात्काळ बंद करून संबंधितावर तात्काळ कडक कार्यवाही करावी अन्यथा लोहा कंधार मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेकापचे नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले असून निवेदनाच्या प्रति, जिल्हाधिकारी नांदेड, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांना दिलेल्या आहेत,
दि. 24 नोव्हें रोज शुक्रवारी शेकापचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची त्यांच्या दालनात प्रत्यक्ष भेट घेऊन लोहा कंधार मतदारसंघातील अवैध मटका, गुडगुडीसह इतर अवैध धंदे बंद करण्यासाठीचे निवेदन दिले आहे.