नांदेड ; प्रतिनिधी
नांदेड येथे झुंजार क्रांती सेना व मित्र पक्ष मराठवाडा मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संघटना बांधणी मजबूतपणे उभी होण्यासाठी नांदेड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा भाग्यश्री पाटील यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न झाली झुंजार क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड अनिल पा होळगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयावर सखोल चर्चा करताना संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्याच्या सोळा तालुक्यापर्यंत संघटना मजबूत पणे उभी होण्यासाठी आपण तळमळीने काम करावे
तर संघटनेचे सचिव गजानन चावरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटना तुमच्या पाठीशी उभी राहिली संघटनेचे उपाध्यक्ष धनराज नावले यांनी बोलताना सांगितले संघटनेनी एखाद्या आदेश दिल्यास आपण एक इंच हि मागे येता कामा नये संघटनेचे सल्लागार प्रा राहुल पाटील यांनी सांगितले एखाद्या व्यक्ती आपल्या पदाने मोठा नसुन कर्तृत्वाने मोठा नकिंच होतो त्यामुळे आपण तळमळीने काम करावे तर मित्र पक्ष आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड देवानंद देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले आपण मित्र पक्ष आहोत आपल्या संघटनेसाठी रात्रीचा दिवस रक्ताच पाणी केल पाहिजे असे आवाहन केले व झुंजार क्रांती सेना नांदेड महिला आघाडी उपाध्यक्ष पदी पौर्णिमा वाघमारे यांची निवड तर रंजना वाघमारे यांची देगलुर खानापूर संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली तेव्हा संघटनेचे मार्गदर्शक नागनाथ कामजळगे देगलुर तालुका अध्यक्ष लक्ष्मीबाई मेंडकर शिवा नावले व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.