कंधार : प्रतिनिधी
कायापालट या उपक्रमाच्या ३८ व्या महिन्यात भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे रस्त्यावरील ४७ भ्रमिष्ट व्यक्तींची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे ,शंभर रुपये बक्षिसी, चहाफराळ दिल्यानंतर त्यांची डॉ.दि.बा. जोशी यांनी वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधी देण्यात आल्यामुळे नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान नांदेडमध्ये साकार करण्यात आले
भाजपा ,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , अमरनाथ यात्री संघाच्या वतीने खा.चिखलीकर, भाजप महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, लायन्सचे योगेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कायापालट उपक्रम दर महिन्यात राबविण्यात येतो.नांदेड शहरातील विविध भागातून वेडसर, निराधार,बेघर,अपंग, कचरा वेचणारे यांना अरुणकुमार काबरा,महेश शिंदे,,संजयकुमार गायकवाड,शिवा लोट यांनी सिद्धेश्वर मंदिर परिसर, गोवर्धनघाट नांदेड येथे आणले. डोक्यावरील केस व दाढी वाढलेल्या या सर्वांची स्वंयसेवक बालाजी खोडके यांना
काळजीपूर्वक कटिंग दाढी केली. त्यानंतर सर्वांना येथेच्छ आंघोळ घालण्यात आली .स्वच्छ व मुबलक पाण्याची व्यवस्था भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्यातर्फे करण्यात आली होती. त्यानंतर सर्वांना नवीन पँट ,शर्ट, अंडर पँट, बनियन इत्यादी कपडे व शंभर रुपये बक्षीसी देण्यात आली. सर्वांना कैलास महाराज वैष्णव व सविता काबरा यांच्या हस्ते चहाफराळ वाटप करण्यात आला. हे पाहून अनेकजण गहिवरून गेले.चार तास सुरु असलेल्या कार्यक्रमानंतर सिद्धेश्वर बाबा शिवमंदिरचा परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.डॉ.दि.बा.जोशी यांनी सर्वांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधोपचार केले.अनेकांची मलमपट्टी करण्यात आली. यापुढे असहाय्य दिसणारे, कचरा वेचणारे, वेडे ,भिकारी, अपंग व्यक्ती आढळल्यास नांदेड शहरातील नागरिकांनी सोमवार १ जानेवारी २०२४ रोजी भाजप अथवा लायन्स सदस्यास माहिती द्यावी असे आवाहन संयोजक ॲड दिलीप ठाकूर यांनी केले. समाजातील उपेक्षित घटकातील सदस्यांची निरंतर सेवा करत असल्याबद्दल दिलीप ठाकूर व त्यांच्या सर्व टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
( छाया: संजयकुमार गायकवाड )