पुरूष हृदय लिहीणं म्हणजे पुरुषांबद्दल माझ्या मनात असलेला आदर व्यक्त करणं असतं.. ते माझ्या inbox मधे धुमाकूळ घालतात आणि त्याचे पडसाद माझ्या हृदयातुन लेखणीत उतरतात.. पण आज जो किस्सा शेअर करणार आहे तो ऐकुन तर तुम्ही आज संपूर्ण रविवार फक्त हसतच बसाल..
एका कार्यक्रमाला मला पाहुणी म्हणुन बोलावलं होतं.. ज्यानी निमंत्रण दिलं त्यांनी त्यांचा नंबर माझ्या नावाखाली लिहीला होता.. आपल्या पुरूष मित्रांना वाटलं , तो माझा नंबर आहे म्हणुन धडाधड त्यांनी मेसेजेस आणि कॉल करायला सुरुवात केली.. मॅम तुमची फिगर छान आहे.. मॅम तुम्ही छान लिहीता .. मॅम तुम्ही हस्तमैथुनावर जास्त लिहा ना.. मॅम मला जॉबची गरज आहे.. मॅम तुमचे रिल्स भारी असतात आणि ज्या व्यक्ती चा तो नंबर दिला होता तो नेमका पुरूष होता.. ते मेसेजेस वाचुन त्यालाही काही सुचेना .. तो मनात म्हणाला , एकतर यांनी मला मॅम केलं त्यातुन माझ्या सुटलेल्या पोटाला म्हणतात , तुमची फिगर छान आहे.. हस्तमैथुन शब्द ऐकुन तर त्याला काहीही सुचेना… दिवसभर बिचारा परेशान .. मग त्यांच्या लक्षात आलं हे मेसेजेस मला नसुन सोनल मॅडम ना आहेत.. किती रे घोळ घालता मित्रांनो..
नंबर दिसला कि डायल करायची घाई .. आणि नवीन स्त्री दिसली की तिला पटवायची घाई.. या सगळ्या घाई गडबडीत मग असा पोपट होतो.. कल्पना करा त्या व्यक्तीला काय वाटलं असेल आणि मनसोक्त हसा..
माझ्याच नवऱ्याला मेसेज करता आणि म्हणता मॅम तुमच्यासोबत डेट ला जायचय.. काल हा मेसेज सचिन मला वाचुन दाखवत होता आणि मला म्हणाला , काय उत्तर देउ ??.. मी त्याला म्हटलं , तु उत्तर देउ नकोस .. पुरुष हृदय याचसाठी आहे.. माझी लेखणी उत्तर देइल.. त्या व्यक्तीला Thanku दादा म्हणावं वाटतय .. यासारखं सुंदर गोड उत्तर असूच शकत नाही..
कलरफुल इनबॉक्स पाहुन मन नक्कीच प्रफुल्लित होतं .. पुरुषांनी नाही तर फ्लर्टींग कोणी करावं ना असाही विचार मनात येतो.. पण फ्लर्टींग करताना ते हेल्दी असावं असं मी एकदा लिहीलं तर एक हुशार व्यक्ती म्हणते , हेल्दी म्हणजे फ्लर्टींगलाही डाएट असतं का ??.. हे वाचल्यावर मी माझं कपाट उघडलं .. त्यातुन इंडीजीनस न्युट्रीशनचं सर्टीफिकेट काढलं आणि त्या सर्टीफिकेटला म्हटलं , माझं काय चुकलं??.. अभ्यास करुन तुला घरात आणलं , आणि भाऊ म्हणतो हेल्दी फ्लर्टींगला डाएट असतं का ??,, बिचारं सर्टीफिकेट पण रडलं रे… विनोद पण हेल्दी करा रे असं मी म्हटलं तर तुम्ही म्हणाल , त्यालाही डाएट असतं का ??.. भगवंता पुढच्या जन्मी पुन्हा यांना माझ्या संपर्कात आणु नकोस रे..
मॅम , तुम्ही मागाल ते देइन.. तुम्ही मला आवडता .. i lv yu.. असे हजारो मेसेजेस जेव्हा मी वाचते तेव्हा मी खऱ्या प्रेमाला रडताना पहाते कारण त्याला माहीत असतं हे शब्द वापरुन हे माझा अपमान करत आहेत.. प्रेम असं शरीर पाहून होत नसतं रे मित्रांनो.. प्रेम ही सुंदर तरल भावना आहे.. शरीरसुख म्हणजे प्रेम नाही.. love means bunch of imotions..आणि त्या इमोशंस व्यक्त व्हायला त्या व्यक्तीसोबत काही काळ घालवावा लागतो .. मी लेखिका म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करता त्याबद्दल मी कृतज्ञ आहेच..
हेच पहा ना दोन दिवस मी आर्टीकल्स लिहीली नाहीत तर तुमचे अनेक मेसेजेस आले.. तुम्ही आवर्जून माझ्या लिखाणाची वाट पहाता पण पुरूष हृदय लिहील्याशिवाय मला समाधान मिळत नाही कारण तोही हळुवार शब्दांनी तुमच्या हृदयावर मारलेला प्रेमाचा ओरखडा आहे.. मी काहीही लिहीलं तरीही तुम्ही अजिबात बदलु नका कारण मी मुळातच पुरुषांवर प्रेम करते…. दोन्हीही माझ्याच बाजु आहेत पण lu वालं प्रेम नाही बरं का..
एकाने काल मेसेज केला , मॅम बियॉन्डसेक्स ची नायिका मिरा तुम्हीच आहात ना.. मला तुमचा सागर व्हायला आवडेल..हा मेसेज वाचुन सहज त्याचं प्रोफाइल चाळलं तर जाणवलं हा तर ओढा आहे .. याची नदी कधी व्हायची त्यानंतर सागर कधी होइल??.. मग मीच विचार केला ,ओढा नदीला मिळतो , अनेक नद्या सागराला मिळतात .. अर्र मी लेखिका आहे म्हणुन काहीही विचार करतेय.. बिचाऱ्याने एक साधा प्रश्न विचारला होता.. मी सहज साधं उत्तर देउ शकते की.. त्याचं उत्तर आहे मी सोनल आहे त्यामुळे सागरची मला गरजच नाही.. कसही करुन फ्लर्टींग करायचं याचसाठी जन्म आपुला .. हो की नाही मित्रांनो.. काहीही असलं तरीही तुम्ही खुप गोड आहात आणि मला पुरूषच आवडतात ही गोष्ट मी अमान्य करुच शकत नाही.. ज्यादिवशी फ्लर्टींग थांबेल त्या दिवशी आपण म्हातारे झालो ही फीलींग नक्की येइल.. तुम्ही आहात म्हणुन मी सुंदर आहे.. तुम्ही आहात म्हणुन मी तरुण आहे.. आणि तुम्ही आहात म्हणुनच स्त्रीला अस्तित्व आहे..पुरूष हृदयचे इतके भाग लिहायला दिल्याबद्दल मनस्वी आभार..
ता.क.
So beautiful….now my family life is being going to normal… because of your few words 🤝 हा माझ्या वाचकाचा मेसेज आहे.. त्याच्या बायकोच्या विवाहबाह्य संबंधामुळे तो आत्महत्या करायला निघाला होता आणि त्याला माझे व्हीडीओ दिसले.. त्याने मला संपर्क केला.. तेव्हा त्याला मी एक वाक्य बोलले ते असं होतं , तुम्ही गेल्यावर Mam you are beautifull असं मला कोण म्हणेल ??.. यात बरच काही आहे.. तुम्ही समजुन घ्याल.. हे त्यावेळी भगवंताने माझ्याकडून करुन घेतलं असेल..
सोनल गोडबोले..