दुचाकीची समोरासमोर धडक एकाचा मृत्यू एकजण जखमी

 

कंधार : (विश्वंभर बसवंते)

कंधार घोडज रस्त्यावर बाळंतवाडी गावाजवळ दि ५ रोजी मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दोन्ही मोटारसायकल समोरासमोर आल्याने अनियंत्रित झाल्या आणि एकमेकींवर धडकल्या. अपघातात मोटारसायकलींचा चक्काचूर झाला. अपघात इतका भीषण होता की यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी झालं आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की मयत बालाजी नारायण जाधव चोंडी कडून कंधार कडे येत असताना गुलाब लक्ष्मण गीते हे कंधार वरून नागदरवाडी कडे जात असताना बाळंतवाडी गावाजवळ एम एच २६ डी के ६४५७ आणि एम एच २६ ए एम ८३११ या दोन्ही मोटरसायकल समोरासमोर येऊन धडकल्या यात बालाजी नारायण जाधव वय ४५ वर्षे रा. मजरेचोंडी ता. लोहा याचा जागीच मृत्यू झाला असून गुलाब लक्ष्मण गीते वय २७ वर्षे रा. नागदरवाडी ता. लोहा हा युवक अपघातात जखमी झाला आहे.

या अपघातातील जखमीस कंधार ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून शासकीय रुग्णालय नांदेड येथे अधिकचारासाठी पाठवण्यात आले असून मयतास शवविच्छेदन प्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *