शिवसेना (शिंदे गट )मागासवर्गीय विभागाच्या कंधार तालुकाप्रमुख पदी पिंटू कदम यांची नियुक्ती.

 

कंधार ; प्रतिनिधी

शिवसेना (शिंदे गट )मागासवर्गीय विभागाच्या कंधार तालूकाप्रमुखपदीसामाजिक कार्यकर्ते पिंटू कदम यांची नियुक्ती ऊत्तर विधानसभा मतदारसंघांचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीय विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश दादा कदम यांनी केली.

कंधार शहरातील युवा कार्यकर्ते पिंटू कदम हे टायगर ग्रुपच्या माध्यमातून
नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या पाठीशी युवकांची मोठी फळी असून त्यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,आमदार बालाजीराव कल्याणकर व मंगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या समर्थकासोबत शिवसेनेत प्रवेश केला. पिंटू कदम यांच्यामुळे कंधार तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याने पिंटू कदम यांना मागासवर्गीय विभाग तालूका प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या एका कार्यक्रमात पिंटू कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रपूर गंगाधर बडूरे , युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख सचिन किसवे,माजी शहरप्रमुख शक्ती ठाकूर ,बिलोली तालूकाप्रमुख मागासवर्गीय विभाग महेंद्र गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *