शालेय पोषण आहार – अंडी व केळी योजना बाजारभाव प्रमाणे निधी देण्याची पुरोगामी ची नागपूर येथे मागणी

नागपूर- दिनांक 11 डिसेंम्बर रोजी नागपूर मंत्रालय येथे पुरोगामी शिक्षक संघटना प्रतिनिधी मंडळाने शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव मा.इम्तियाज काझी यांची भेट घेत 1)शालेय पोषण आहार अंतर्गत सकस आहार मध्ये विद्यार्थ्यांसाठी अंडी व केळी देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र बाजारभावापेक्षा कमी दर शासनाकडून मिळत आहे ही बाब संघटनेने लक्षात आणून दिली. यावेळी भविष्यात निधी देताना बाजारभाव प्रमाणे देण्यात येईल असे आश्वासन काझी साहेब यांनी दिले.

2) अनेक शाळांना अजूनही निधी प्राप्त झाला नाही— निधी पाठवण्यात आला आहे, PFMS प्रणाली मधून मागे पुढे जमा होईल. याबाबत तक्रारी असल्यास कळवण्यात याव्यात.

3) पुढच्या वेळी निधी योजना राबवण्याचा 15 दिवस आधी खात्यावर जमा करण्यात यावा आदी शालेय पोषण आहार बाबत मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये, राज्य उपाध्यक्ष जी. एस मंगनाळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस.के.पाटील, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, वाशिम जिल्हाध्यक्ष इरफान मिर्झा, रत्नागिरी नेते प्रदीप पवार, जालना जिल्हाध्यक्ष दिनकर पालवे,कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस तुषार पाटील वाशिम जिल्हा सरचिटणीस प्रदीप गावंडे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष जीवन भोयर, लोमेश येलमुले, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत टिपूगडे, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव शिंदे आदी उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *