लोहा / प्रतिनिधी
लोहा शहरात साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा लोहा न.पा. च्या जागेत बसवावा अशी मागणी सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने लोहा न.पा. चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुढे निवेदनात असे नमूद केले की, नांदेड ते लातूर हायवे महामार्गावरील नियोजित जागेवर साहित्यरंत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात यावे या मागणीसाठी गेली अनेक वर्षांपासून लोहा शहरासहीत तालुक्यातील सर्व मातंग समाज बांधवाची मागणी आहे.
साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे संग्रह विश्र्वातील श्रमिक कष्टकरी समाजाचे नेते आणि अस्मिता आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून स्मारकासाठी आम्ही पाठपुऱवठा करीत आहोत आणि आपल्याकडून आपल्या कार्यकाळात साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा राहावा अशी मातंग समाजासह सर्व बहुजन समाज बांधवांची अंतर मनातील आशा आहे .
तेव्हा साहित्यरंत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या कामास वेळ न लावता लोहा न.पा.च्या वतीने नियोजित जागेवर पुतळ्याचे काम न.पा.ने सुरू करावे अशी मागणी सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.