उर्ध्व मानार लिंबोटी प्रकल्पातील उपलब्ध २५ दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश
लोहा; प्रतिनिधी
उर्ध्व मानार प्रकल्पावरील कालवा समितीची बैठक काल दि. १२ डिसेंबर रोज मंगळवारी लोहा तहसील कार्यालयात लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली,
यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे, तहसीलदार शंकर लाड, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रसेन पाटील, खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णाराव पवार, कालवा सल्लागार समितीचे सदस्य सचिव तथा सहाय्यक अभियंता एस.एन. फुलारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष चौगुले, शाखा विभागाचे अक्षय राजपूत, सिंचन शाखाधिकारी बालाजी रानवळकर, लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र काळे या बैठकीस प्रमुख उपस्थित होते.
यावेळी या बैठकीत आमदार शामसुंदर शिंदे यांनी उर्ध्व मानार प्रकल्पातील उपलब्ध पाण्याविषयी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा करून यावर्षी पाऊस अत्यंत कमी झाल्यामुळे उर्ध्व मानार लिंबोटी प्रकल्पासह इतर धरणात व तलावात अत्यंत कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने यापुढील काळात उर्ध्व मानार लिंबोटी धरणाच्या प्रकल्पातून यापुढे लिंबोटी धरणाच्या प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला व लिंबोटी धरण प्रकल्पात सध्या उपलब्ध असलेला २५ दलघमी पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचे निर्देश यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी बैठकीतील उपस्थित पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले, यावेळी पाटबंधारे विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लिंबोटी प्रकल्पातील उपलब्ध २५ दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित केले जाणार असल्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांना सांगितले ,यावेळी शेकापचे तालुका अध्यक्ष नागेश पाटील हिलाल सह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.