शिक्षक सेनेचा संविधान भेट स्तुत्य उपक्रम – मिनल करनवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड …! शिक्षक सेनेचा उपक्रम संविधान भेट.

 

नांदेड ; प्रतिनिधी

दि . 13/12/2023 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांदेड च्या वतीने दरवर्षी संविधान दिनानिमित्त, संविधान प्रचार व प्रसार व्हावा, प्रत्येक बांधवानी हे संविधान हाताळले पाहिजे व त्या अनुषंगाने आपले हक्क व कर्तव्ये जागृत होणे या उद्देशाने 26 नोव्हेंबर ते 12 जानेवारी पर्यंत नांदेड जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील, पत्रकार बांधव, डॉक्टर, पोलीस दलातील अधिकारी, शिक्षक बांधव या मान्यवरांना देत असतो. या वर्षी. जिल्हा परिषद नांदेड च्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम यांना देण्यात आले,

 

यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर जिल्हा सरचिटणीस रवि बंडेवार जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर ढवळे, जिल्हा मार्गदर्शक शिवाजी पाटील, कदम सर यावेळी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *