कंधार ; प्रतिनिधी
जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसह अन्य न्यायीक मागण्यांसाठी दिनांक 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीमध्ये ऐतिहासिक संप करून सदर संपाच्या फलितार्थ जूनी पेन्शन साठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने समिती स्थापन करण्यात आली सदर समितीला अहवाल सादर करण्या साठी महिण्याची मुदत देण्यात आली होत्ती . परंतू विहीत कालावधी मध्ये अहवाल पूर्ण न झाल्यामुळे समितीला मुदतवाढ देण्यात आली. मात्र सदर समितीला ३ महिण मुदत देऊनही समितीने अद्याप अहवाल जाहीर केलेल नाही. सदर बाबतीत शासन वेळकाढूपणाचे धोरण अवलंबित आहे.दिनांक 14-12-2023 पासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली .
परिणामी जूनी पेन्शन या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी, जिल्हा परिषद निमसरकारी तथा शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या माध्यमातून दिनांक 14-12-2023 पासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली
न्यायीक मागण्यांसाठी संप आणि आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन नेहमीच अग्रेसर राहीलेली अहि. त्या अन्वये दि. 14.12.2023 पासून पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा कंधार वेधील सर्व सभासद (कंत्राटी ग्रामसेवक वगळून) बेमुदत संपात व आंदोलनात सहभागी आहेत.
करिता आमच्या न्यायीक मागण्या मान्य करण्यासाठ, पंचायत समिती कंधार प्रशासननि राज्य शासनाकडे पहिलंचवून संप व आदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. बिलास नारनाळीकर ,जगदेब शिंदे ,एन.डी. सोनकांबळे ,विश्वनाथ केंद्रे , आदी सह ग्रामसेवक संघटना सदस्यांची स्वाक्षरी आहेत .