पो.कॉ. संतोष काळे यांची पो.हे.कॉ. पदी पदोन्नती.. फुलवळ येथे जंगी सत्कार….

फुलवळ ;(धोंडीबा बोरगावे )

कंधार पोलीस ठाणे येथे पोलीस कॉनिस्टबल पदावर कार्यरत असलेले आणि फुलवळ बिट चे बिट जमादार संतोष नारायणराव काळे यांना नुकतीच ता.७ डिसेंबर रोजी पोलीस हेड कॉनिस्टबल पदावर पदोन्नती मिळाली असल्याने फुलवळ येथे त्यांचे शाल , श्रीफळ देऊन पेढा भरवून जंगी स्वागत करण्यात आले.

 

संतोष काळे हे २००६ साली पोलीस शिपाई यादवर पोलीस दलात नोकरीत दाखल झाले असून त्यांच्या १७ वर्षाच्या कारकिर्दीत समाधानकारक कर्तव्य बजावत अनेकांना आपल्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या आजपर्यंत च्या कारकिर्दीचा लेखाजोखा पाहत त्यांना बढती मिळाली असल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

 

तसाच फुलवळ येथेही त्यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या , यावेळी नवनाथ बनसोडे , आनंदा पवार , दत्ता डांगे , दीपक बसवंते , उद्धव देवकांबळे , ज्ञानेश्वर बसवंते , ओमकार बसवंते , कैलास फुलवळे , वैभव देवकांबळे , संजय बसवंते , हैदर शेख , धम्मानंद जाधव , सलीम शेख , धोंडीबा बोरगावे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *