अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण स्वामी रामानंद तीर्थ कॉलेज कंधार येथे सुरू
कंधार ; प्रतिनिधी
गटशिक्षणाधिकारी कंधार संजय यरमे यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी आगलावे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१४ डिसेंबर रोजी तालुक्यातील तीन कुलाचे पाच दिवसाचे प्रशिक्षण सुरळीतपणे चालू आहे .दि १२ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२३ पाच दिवसांच्या कालावधीत सदरील प्रशिक्षण चालू असून पाच दिवसांचा प्रशिक्षणातून शिक्षकांना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची दिशा मिळेल असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करतांना केले .
कंधार येथील स्वामी रामानंद तीर्थ पब्लिक स्कूल बाळंतवाडी येथे पाच दिवसाचे प्रशिक्षण चालू आहे त्यावेळी मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी संजय यरमे बोलत होते .
यावेळी तिन कुलात पशिक्षणाची बैठक व्यवस्था करण्यात आली होती . कुलाचे कुलपती यांनी लातूर डायट येथे प्रशिक्षण घेऊन कंधार तालुक्यातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत , तर मंगनाळे डी एन , कनकवले चांदोबा , शिंदे विक्रम , शिवसाब गणाचार्य ओमप्रकाश यरमे ,वळसे सर ,मोरे बी.डी केंद्रप्रमुख मुस्तफा शेख ,बालाजी राठोड ,सखोल मार्गदर्शन करत आहेत .
चौकट
सर्व खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांची आज दुपारी 12:30 वाजता U Dise+ संदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. तात्काळ सर्वांनी गतीने काम पूर्ण करावे कंधार तालुक्यातील ४५ टक्के असलेले काम १०० टक्के करण्या बाबत गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांनी सुचना दिल्या .