शब्दवेध’ पुरस्काराची घोषणा ;लोक पत्रकारिता आणि समाजशिक्षक’ असे दोन पुरस्कार देण्यात येणार

कंधार ; प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर – शब्दवेध बुक हाऊस या प्रकाशन संस्थेच्या वतीने २०२४ सालापासून ‘लोक पत्रकारिता आणि समाजशिक्षक’ असे दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंपर्क विभागाचे माजी प्रमुख प्रा. सुरेश पुरी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘प्रा. सुरेश पुरी लोकपत्रकारिता पुरस्कार’ तर माजी सैनिक स्मृतिशेष ‘प्रा. विठ्ठल गोरे समाजशिक्षक’ पुरस्कार देण्यात येणार आहे.

या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पाच हजार रुपये, मानचिन्ह असे असेल. लवकर पुरस्कारार्थीचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शब्दवेध बुक हाऊसचे प्रकाशक वैजनाथ वाघमारे यांनी कळविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *